एक्स्प्लोर

स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी, पंकजा मुंडेंची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका

पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुटुंब नसल्याची टीका केली जाते. पण नरेंद्र मोदी यांचं कुटुंब ही जनता आहे. स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात चोर कुठले, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली. पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्यातील नरसीमध्ये एका खाजगी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब समजून काम करतात. मात्र हे कालचे आलेले नेते स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले, यांनी या राज्याला लूटलं, या देशाला लूटलं आणि हे लोकं सांगतात की नरेंद्र मोदी यांना कुटुंब नाही. पण या देशातील गरीब, वंचित, पीडित जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिवार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या नरसी येथील जय भारत शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. नांदेड जिल्ह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली. पण नांदेड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आजही नरसी येथे पाण्याची समस्या आहे. माझ्याकडे राज्याचं मंत्रीपद असलं तरी मी बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. अशोक चव्हाणा यांचे वडील शंकरराव चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री होते. शिवाय त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदही भूषवलं आहे. तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी विकासाच्या मुद्यावरुन दोघांवरही निशाणा साधला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shinde Samiti: शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर
शिंदे समितीचा धडाका; राज्यात आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या, 'इतक्या' मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र प्रदान, मंत्रिमंडळ बैठकीत माहिती समोर
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
SSC HSC Exam Copy: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपी, 22 शिक्षक, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget