एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भगवान गडावर येणारच, पंकजा मुंडेंचा व्हिडीओ मेसेज
मुंबई/बीड : दसरा तोंडावर आला असताना भगवानगडाचा वाद आणखी वाढत चालला आहे. महंत नामदेव शास्त्रींच्या इशाऱ्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर जाणारच असा निर्धार केला आहे. आधी फेसबुकवर त्यानंतर आता ट्विटरवर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये त्यांनी, "मी पंकजा गोपीनाथ मुंडे...येत आहे दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी- आपल्यासाठी, भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. मग भेटूया दसऱ्याला, तुम्ही येणार ना?" असं म्हटलं आहे.
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) October 7, 2016नामदेव शास्त्रींचा इशारा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सामान्य भक्ताप्रमाणे भगवान गडावर यावं, मात्र त्यांनी भाषण करु नये, अशी अट महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी घातली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट पंकजा मुंडे यांनी भगवान गडाबाबत फेसबुक पोस्ट अपलोड केली. “हो मी येणार दसऱ्याला तुमच्यासाठी, आपल्यासाठी भगवान गडाची कन्या म्हणून भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी… आणि तुम्ही? तुम्ही येणार ना?” असं पंकजा यांनी म्हटलं आहे. भगवान गडाचा वाद नेमका काय? भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरण होतं. गोपीनाथ मुंडे यांचं दसरा मेळाव्याला भगवान गडावरुन भाषण होत असे. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भगवान गडावर राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली. त्याला वंजारी सेवा संघानं विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. गेल्या वर्षी भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद सुरु झाले. त्यानंतर या गडावरुन राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका नामदेवशास्त्रींनी घेतली. गोपीनाथ गडावरुन भाषण करावं भगवानगडावरुन राजकीय भाषण करु नये असं सांगत नामदेव शास्त्री म्हणाले, “पंकजा मुंडेंनी गोपीनाथगड उभा केला आहे. त्याठिकाणी त्यांनी राजकीय भाषण करावं”. वंजारी संघाचा इशारा भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
संबंधित बातमी
भगवान गडावर ये, पण भाषण नको, नामदेवशास्त्रींची पंकजा मुंडेंना अट दसऱ्याला भगवान गडावर येणारच: पंकजा मुंडे महंत नामदेव शास्त्रींवर जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा भगवानगडावर राडा, नामदेव शास्त्री-पंकजा मुंडे समर्थक भिडले भगवानगड दसरा मेळावा वादः नामदेव शास्त्रींचं मुख्यमंत्र्यांना पत्रअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
Advertisement