एक्स्प्लोर

भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार?

संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे यावर्षी दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे.

बीड : भगवानगड दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत करुन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. संत भगवान बाबा यांचं जन्मगाव असलेल्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे यावर्षी दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता भगवान बाबांच्या कर्मभूमीतून त्यांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली आहे. पंकजा मुंडे यांनी 27 नोव्हेंबर 2015 ला एका व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा गोपीनाथगडा विषयीची माहिती दिली. 12 डिसेंबरला होणाऱ्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहन केलं. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात फक्त एकाच गडाची चर्चा व्हायची, ती म्हणजे भगवानगडाची. आता यात आणखी एका गडाचा समावेश झाला होता. म्हणूनच 27 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या काळात नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्या तीनवेळा बैठका झाल्या. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्या वादाची सुरुवात गोपीनाथ गड... मुंडे समर्थकांचं नवं श्रद्धास्थान... स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक... जिथे भाजपाध्यक्ष आले... मुख्यमंत्री आले... आणि इथेच दोन गडांमध्ये ठिणगी पडली... भगवानगड भक्तीचा आणि गोपीनाथगड शक्तीचा... नामदेव शास्त्रींच्या या घोषणेने पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमध्ये दरी निर्माण झाली. शक्तीचं विकेंद्रीकरण भगवानगडाला रुचलं नव्हतं. डिसेंबर 2015 ला सुरु झालेल्या वादाला 5 महिने लोटले. मार्च महिन्यात भगवानगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाचं निमंत्रण मुंडे बंधू-भगिनींना मिळालं. पण राजकीय भाषणे होणार नाहीत, असे स्पष्ट आदेश होते. 24 मार्चला एकाच दिवशी दोघे बहिण भाऊ म्हणजे धनंजय आणि पंकजांनी एकाच दिवशी हजेरी लावली. मात्र या दोघांचीही भाषणे सप्ताहाच्या व्यासपीठावर झाली नाहीत. त्यासाठी वेगळे स्टेज उभारण्यात आले होते. दसरा जवळ येत होता आणि मेळाव्यासाठी समर्थक आक्रमक होत होते. भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा काय आहे ? 1965 साली संत भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या 25 गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी 38 वर्षे चालवली. 1993 साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडावर पहिला मोठा सामाजिक कार्यक्रम घेतला. तत्कालिन मठाधिपती भीमसेन महाराजांचं 2003 साली निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली. गोपीनाथ मुंडे होते, तोपर्यंत राज्यभरातील भगवान बाबांचे लाखो भक्त आणि मुंडे समर्थक गडावर यायचे. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार? भगवानगडावरील याच ठिकाणी एक स्टेज होतं, ज्या स्टेजवरून गोपीनाथ मुंडे भाषण करायचे. ते स्टेज गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पाडण्यात आलं. गोपीनाथ मुंडेंनंतर इतर कोणालाही या ठिकाणाहून भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता. दरी आणखी रुंदावली. चर्चेच्या फेऱ्या कधीच थांबल्या. दसरा उजाडला, लाखो मुंडे समर्थक भगवानगडाच्या पायथ्याला जमले. पंकजा मुंडेंचा ताफा थेट भगवानगडावर दाखल झाला. गेल्या वर्षी दोन गट निर्माण झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. पण पंकजा मुंडेंच्या आवाहनाने वातावरण निवळलं. यंदाही या निखाऱ्यांना पुन्हा हवा मिळाली असती. पण पंकजा यांनी सभेचा मुक्काम भगवान बाबांच्या जन्मगावी वळवला आणि पुन्हा दरी रुंदावली. भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार का? हे या दसरा मेळाव्याला दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget