एक्स्प्लोर
Advertisement
मंचावर उपस्थित विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजयजी मुंडे : पंकजा मुंडे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांची बहिण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचं नाव घेणं टाळलं. मात्र पंकजा मुंडेंनी राजकीय शिष्टाचारानुसार त्यांच्या भाषणात धनंजय मुंडेंचं नाव घेत उपस्थितांची मनं जिंकली.
औरंगाबाद : राजकारणात नेत्यांचे वैयक्तिक मतभेद असले तरीही राजकीय शिष्टाचार म्हणून सार्वजनिक जीवनात एकमेकांचं नाव घ्यावंच लागतं. याचीच प्रचिती काल औरंगाबादमधील कार्यक्रमात आली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांची बहिण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचं नाव घेणं टाळलं. मात्र पंकजा मुंडेंनी राजकीय शिष्टाचार जपत त्यांच्या भाषणात धनंजय मुंडेंचं नाव घेत उपस्थितांची मनं जिंकली. पंकजा मुंडेंनी त्यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांचं नाव घेताच उपस्थितांनीही त्याला जोरदार दाद दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये काल दिग्गज नेत्यांनी भाषणं केली. मात्र ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाचीच सर्वाधिक चर्चा रंगली. पंकजा मुंडेंनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची नावं घेतली. त्यामध्ये धनंजय मुंडेंच्या नावाचाही समावेश होता.
शरद पवार यांच्या अर्धशतकी राजकीय कारकीर्दीनिमीत्त आयोजित सत्कार सभारंभाच्या पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नाव नव्हतं. कारण त्यांचा पूर्वनियोजित दौरा होता. पण आयोजकांच्या विनंतीवरून त्या आवर्जून उपस्थित राहिल्या.
पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा गौरवपूर्वक ऊल्लेख करुन त्यांना राजकारणातील एव्हरेस्ट अशी ऊपमा दिली. तसेच या कार्यक्रमाच्या स्टेजवर गोपीनाथराव मुंडे आणि विलासराव देशमुख यांची ऊणीव भासत असल्याचंही सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement