एक्स्प्लोर
पंढरपुरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या कॉलेज तरुणीवर गँगरेप

पंढरपूर : मित्रासोबत फिरायला आलेल्या कॉलेज तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरच्या शिखर शिंगणापूरच्या घाटात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अकलूजमधील कॉलेज तरुणी मित्रासोबत शिखर शिंगणापूर घाटात फिरायला आली होती. त्यावेळी दोन आरोपींनी तिच्या मित्राला नग्न करुन मारहाण केली. त्यानंतर दोघांना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. 10 मार्च रोजी ही घटना घडली असून रविवारी रात्री तक्रार दाखल करण्यात आली. एका आरोपीला नातेपुते पोलिसांनी अटक केली असून दुसरा फरार आहे.
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















