Pandharpur News: सदोष रस्ते बांधणी आणि यंदाचा जोरदार झालेला पाऊस यामुळे पंढरपूर शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. असं असताना प्रशासन मात्र मुरूम आणून खड्डे बुजवत असल्याचं चित्र आहे.  हे खड्डे लगेच पुन्हा उघडे पडून नागरिकांचे अपघात होऊ लागल्यानंतर मनसेकडून काल दिवसभर आणि रात्री शहरातील बहुतांश खड्डे हे काँक्रिट मिक्सर आणून बुजविल्याने नागरिक आणि भाविकांना थोडा दिलासा मिळाला आहे. 


फक्त कमिशनवर नजर ठेऊन सदोष रस्ते बनविल्याने सर्व रस्त्यांवर लगेचच खड्डे पडत असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे. प्रशासन पुढे येत नसल्याने नागरिकांना सातत्याचे अपघात आणि त्रासाला सामोरे जावे लागू लागल्यावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चाने काँक्रीट मिक्सरसह यंत्रणा उभारून दिवसभर आणि वाहतूक असणाऱ्या मार्गावर रात्रभर खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले. 


शहरातील प्रमुख मार्गावरील बहुतांश खड्डे आता काँक्रिटने बुजविल्याने नागरिक आणि कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असला तरी रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर नागरिकांचे पैसे खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.  


ही बातमी देखील वाचा-  Dhule: अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांनी विश्रांती कशी घ्यायची? एसटी कर्मचाऱ्यांच्या रेस्ट रुमचे भीषण वास्तव