एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2021 : आषाढी यात्रा काळात नऊ दिवस एसटी बस सेवेसह पंढरपूरमधील सर्व वाहतूक बंद

आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे.

पंढरपूर : कोरोना संकटात सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे . या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे.  पंढरपूर शहरासह शेजारील वाखरी, भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, कोर्टी , गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या दहा गावात या नऊ दिवसात काटेकोरपणे संचारबंदीचे अवलंब केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय एकही भाविकाला शहरात येत येणार नसून यासाठी जिल्हा सीमा, तालुका सीमा आणि शहर सीमेवर पोलिसांची त्रिस्तरीय नाकेबंदी केली जाणार आहे.  आषाढी यात्रा काळात म्हणजे 17 जुलै पासून 25 जुलैपर्यंत केवळ शासनाने परवानगी दिलेल्या वारकऱ्यांना स्नानाची परवानगी दिली असून इतर वारकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेशही दिले आहेत. 

ज्या मानाच्या 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे त्यामधील प्रत्येक पालखीतील 40 भाविकांची RTPCR तपासणी करून मगच त्यांना पंढरपूर कडे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे . या सर्व 400  वारकऱ्यांना संबंधित पालखी सोहळे पासेस देणार आहेत . या परवानगी दिलेल्या 400 वारकरी  दहा पालखी सोहळ्यासोबत 19 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध दशमी दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी येथील पालखी तळावर  बसने पोचतील. हे दहा  पालखी सोहळे वाखरी पालखी तळापासून पंढरपूर शहराच्या विसाव्यापर्यंत पायी चालत येतील. येथे 10 पालखी सोहळ्यातील संतांच्या पादुका 20 वारकरी घेऊन पंढरपूर शहरात पोचतील तर उर्वरित 380 वारकरी बसने आपापल्या मठात पोहचतील.

 आषाढी एकादशी ला पहाटे दोन वाजून वीस  मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय महापूजा करणार आहेत. आषाढीसाठी आलेले पालखी सोहळे 24 जुलै रोजी परतीचा प्रवास करतील असे आदेश देण्यात आले आहेत . 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
Maharashtra LIVE Blog Updates: सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार
Maharashtra Live blog updates: सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal NCP: राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांचा 'तो' इशारा, म्हणाले, आपली मतं कमी करण्याचा डाव...'
Akola News : अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
अकोल्याच्या सार्थक ढोलेची जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक; 2019 नंतर भारताला पहिले पदक
Randhir Singh Passes Away : भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
भारताला एशियन गेम्समध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारा दिग्गज हरपला, शुटर रणधीर सिंग यांचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
जनगणना कामावर असलेल्या महिला शिक्षकाचा अपघाती मृत्यू; राज्यात आत्तापर्यंत 4 ठार, शिक्षक संघटना संतप्त
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
SRH vs RR Eliminator IPL 2026 : एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
एकही चेंडू न खेळता राजस्थान रॉयल्स जाऊ शकतो आयपीएलमधून बाहेर? समजून घ्या IPLचा सर्वात खतरनाक नियम
Embed widget