एक्स्प्लोर
सालगड्याच्या मुलाशी लग्न, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या
सलगरमधील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकमधील सिंदगी इथे बीएएमएसचे शिक्षण घेत होती.

पंढरपूर : तेलंगणातील ऑनर किलिंगची घटना ताजी असतानाच, मंगळवेढ्यातही अशाच प्रकार समोर आला आहे. शेतातील सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्याच्या रागातून ऑनर किलिंगची घटना मंगळवेढ्यातील सलगर बुद्रुक इथे घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची घरच्यांनी हत्या केल्याचं समोर आलं आहे. सलगरमधील अनुराधा बिराजदार ही कर्नाटकमधील सिंदगी इथे बीएएमएसचे शिक्षण घेत होती. त्यांच्यात शेतातील सालगड्याच्या मुलासोबत अनुराधाने 1 ऑक्टोबरला लग्न केलं होतं. यानंतर अनुराधा मामाच्या बोराळे इथल्या घरी राहत होती. पण या लग्नामुळे संतापलेले वडील अनुराधाला मामाच्या घरातून गेले. त्यानंतर 4 ऑक्टोबरच्या पहाटे शेतात हत्या करुन अंत्यसंस्कार केले. ऑनर किलिंग प्रकरणी मुलीचे मामा बाळासाहेब म्हमाने यांच्या तक्रारीवरुन वडील विठ्ठल आणि सावत्र आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. अनुराधाने मामाच्या घरी असताना वडिलांपासून जिवाला धोका असल्याच्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्याचीही माहिती समोर येत आहे. या चिठ्ठ्या मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















