Palghar Vasai Land Slide :  वसईच्या राजवली वाघरल पाडा (Vasai Rain) या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळते आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झालेत आणि बचावकार्य सुरु आहे.


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळली 
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळली आहे. यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.  एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. 







पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. घरासह घरातील सामग्रीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.






पालघरमध्ये (Palghar) दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी


भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स


Maharashtra Dam Update : पावसाचा जोर; धरणं ओसंडली! पाणीसाठ्यात भरपूर वाढ, जाणून राज्यातील धरणांची स्थिती