Maharashtra Mumbai Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jul 2022 10:41 PM
पालघर - वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले

मुंबई वडोदरा महामार्गाच्या फ्लाय ओव्हर ब्रीजच काम सुरू असताना अचानक पूर आल्याने  वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले.  हे सर्व जण स्किल्ड वर्कर असल्याचे सांगण्यात येते.
एन डी आर एफ च्यां टीम ला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली आहे. जीव वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी 6 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे  दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

Beed : पुसरा नदीला पूर आल्याने दहा गावांचा संपर्क तुटला..

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संतधर पावसामुळे अनेक नद्यांना व नाल्यांना पूर आलाय वडवणी तालुक्यातील पुसरा गावच्या नदीला पूर आल्याने तालुक्यातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे पुराचे पाणी सध्या पुलावरून वाहत असल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. आज वडवणीच्या आठवणी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक वडवणी शहरात आले होते मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने नदीला पूर आला आणि याच पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांना आपली वाट मोकळी करावी लागली

मोठी बातमी: जायकवाडी धरणात एक लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरु

Aurangabad Rain Update: नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 1 लाख 5 हजार 164 क्युसेक या वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण तब्बल 48.70 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1057.303 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1511.12 फुट असून, मीटरमध्ये 460.589 मीटर आहे. तर धरण क्षेत्रात सुरु असेलला पाऊस अजूनही सुरुच आहे.

रत्नागिरी - जगबुडी नदीच्या प्रवाहात सहा ते सात गुरे अडकली 

रत्नागिरी  - जगबुडी नदीच्या प्रवाहात सहा ते सात गुरे अडकली आहेत.  अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने , शेतात चरण्यासाठी गेलेली पाळीव गुरे अडकली आहेत. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास गुरे वाहून जाण्याची भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Rain Update : संततधार पावसामुळे हजारो एकर बासमती भातशेती पाण्याखाली, शेतकऱ्याला दुबार पेरणीचा भुर्दंड

Rain Update : मुसळधार पावसामुळे  बळारी नाल्याचे पाणी  आजूबाजूला असलेल्या शेतात  शिरून मोठ्या प्रमाणावर भात पीक पाण्याखाली गेले आहे .सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतांना नदी पात्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.एकरी हजारो रुपये खर्चून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता पाऊस कमी होवून पाणी ओसरल्यावर दुबार पेरणी करावी लागणार आहे.बळारी नाल्याच्या आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे शिवाय पावसामुळे पाणी वाहत येवून येळूर,धामणे,वडगाव,जुने बेळगाव,शहापूर आणि हलगा परिसरातील हजारो एकर भात शेतीत पाणी थांबले आहे.शेतकऱ्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत पण सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पाणी कमी होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे

खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली एनडीएफच्या टीम सज्ज

मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे..त्यामुळे नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..  खबरदारी उपाय म्हणून NDRF ची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Ratnagiri Rain : खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एनडीएफच्या टीम सज्ज

Ratnagiri Rain : आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने जोर धराला आहे.मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे..त्यामुळे नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. खबरदारी उपाय म्हणून NDRF ची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, दिनांक 13 जुलै ते 17 जुलै या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी  मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

Palghar Rain : पालघर जिल्ह्याला पुढील दोन दिवस रेड अलर्ट, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Palghar Rain  : पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. 

बदलापूर : बदलापूर कर्जत महामार्ग वाहतूक बंद

बदलापूर कर्जत महामार्ग वाहतूक बंद करण्यात आली आहे. बदलापूरमधील चमटोळी या गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे. 

पातळगंगा, कुंडलिका आणि अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली

Raigad rain update : रायगड जिल्हयातील पातळगंगा, कुंडलिका आणि अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. 

Raigad : वाकण-पाली वाहतूक बंद

Raigad rain update  : आंबा नदीवरील पुलावर पाणी आले असल्यामुळे वाकण-पाली वाहतूक बंद करण्यात आली आहे

Aurangabad: जायकवाडी धरणात 95 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरु; पूरपरिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून

Aurangabad Rain Update: नाशिक जिल्ह्यातील धरणातून सुरु असलेला विसर्ग आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात 95 हजार 556 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. तर जायकवाडी धरण तब्बल 46 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील जिवंत पाणीसाठा 1014.421 दलघमी आहे. तर फुटामध्ये पाणीपातळी 1510.65 फुट असून, मीटरमध्ये 460.446 मीटर आहे. तर धरण क्षेत्रात सुरु असेलला पाऊस अजूनही सुरुच आहे.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई, दि. 13 : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सकाळपासूनच सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बोलतो आहे. त्याचबरोबर रात्री उशिरा देखील मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशीही चर्चा झाली आहे. धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क आणि सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत.पण दुर्देवाने तशी वेळ आल्यास त्या ठिकाणी तत्काळ आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा पोहचतील असे प्रयत्न आहेत. आतापर्यंत ज्यांना स्थलांतरित केले आहे, त्यांना जेवण तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.'

Aurangabad Rain News : फुलसावंगी परिसरात पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे परिसरातील शेतात पाणी

Aurangabad Rain News : फुलसावंगी परिसरात पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे परिसरातील शेतात पाणी शिरून सोयाबीन,कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. संबंधित कृषी विभाग,महसूल विभाग यांनी त्वरित नुकसानीचे पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.तसेच शिरफुली शेतशिवारत मोठ्या प्रमाणात नदीच्या पुराचे पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत आहे.तसेच शिरफुली,राहूर,गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे.त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात गावातील घरामध्ये पाणी जाऊन नुकसान होऊ शकते.त्यामुळे प्रशासनाने या गावाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.सध्या स्थितीत फुलसावंगी परिसरातील शिरफुल्ली,राहूर,रस्त्यावरील नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.ढाणकी फुलसावंगी रस्त्यावरील पुल परत एकदा वाहून गेल्याने निंगणुर,चिंचोली,सह अनेक गावांचा संपर्क सध्यस्थितीत तुटला आहे.

पुढील ४८ तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता

Pune Rain Update : पुढील ४८ तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात प्रेम पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.   

नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 118 मि.मी. पाऊसाची नोंद,जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी

Nanded Rain update : नांदेड जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 510.30 मिलीमीटर पाऊसाची नोंद  झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, आसना, मन्याड,पैनगंगा, मांजरा ह्या दुथडी भरून वाहत आहेत.तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे.दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर,हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली,नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून सखल भागातील रहिवाशी परिसरातील घरात पाणी घुसले आहे.

जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे.

कंसात तालुका निहाय झालेला  एकूण पाऊस.

नांदेड- 124.90 आतापर्यंत झालेला पाऊस (528.30)

 बिलोली-127.90 (513.80),

 मुखेड- 79.30 (480.30),

 कंधार-98.60 (547.20),

 लोहा-121.80 (505.90),

 हदगाव-164.50 (459.40),

 भोकर- 167.30 (552.10),

 देगलूर-58.20 (454.70),

 किनवट-100.30 (503.40),

 मुदखेड- 152.40 (639.50),

 हिमायतनगर-183.10 (668.20),

 माहूर- 86.40 (420.10),

 धर्माबाद-109.50 (510.80),

 उमरी- 151.30 (593.00)

अर्धापूर- 115.80 (490.),

 नायगाव- 136.20 (451.70) मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्हाभरात 510 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

यवतमाळ - तीन गावांचा संपर्क तुटला

Rain Update : काल पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव तालुक्यातील शिरपूली, राहुर आणि मधापूर या तीन गावांचा संपर्क पहाटे पासून तुटला आहे. महागाव व उमरखेड तालुक्यातुन जात असलेल्या वैनगंगा नदी पात्रातील पाणी नाल्याला आल्याने या भागात असलेल्या गावाच्या उंबरट्यावर पाणी पोहचले आहे. मोहपूर, फुलसावगी, डोंगरगाव या गावात असलेल्या छोट्या डॅम चे कोल्हापुरी बंधाराचे दरवाजे उघडे असल्याने या तिन्ही गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली आले आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. तहसीलदार, गटविकास अधिकरी सतत लक्ष ठेऊन आहे. त्याचप्रमाणे  शिरले शेतात राहुटी करून असलेल्या 15 ते 20 कुटुंब हे संपर्क तुटला आहे. या तिन्ही गावातील शेतजमीन ही पाण्याखाली आलेली आहे. जिल्हाप्रशासन या गावावर लक्ष ठेऊन आहे.

Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 118 मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी 
नांदेड जिल्ह्यात बुधवार 13 जुलै रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 510.30 मिलीमीटर पाऊसाची नोंद  झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नद्या गोदावरी, आसना, मन्याड,पैनगंगा, मांजरा ह्या दुथडी भरून वाहत आहेत.तर नांदेड शहराची तहान भागवणारा डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प 84.21 टक्के क्षमतेने भरला आहे.दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर,हदगाव, उमरी, मुदखेड, मुखेड, बिलोली,नांदेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून सखल भागातील रहिवाशी परिसरातील घरात पाणी घुसले आहे.

जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे.

कंसात तालुका निहाय झालेला  एकूण पाऊस.

नांदेड- 124.90 आतापर्यंत झालेला पाऊस (528.30)

 बिलोली-127.90 (513.80),

 मुखेड- 79.30 (480.30),

 कंधार-98.60 (547.20),

 लोहा-121.80 (505.90),

 हदगाव-164.50 (459.40),

 भोकर- 167.30 (552.10),

 देगलूर-58.20 (454.70),

 किनवट-100.30 (503.40),

 मुदखेड- 152.40 (639.50),

 हिमायतनगर-183.10 (668.20),

 माहूर- 86.40 (420.10),

 धर्माबाद-109.50 (510.80),

 उमरी- 151.30 (593.00)

अर्धापूर- 115.80 (490.),

 नायगाव- 136.20 (451.70) मिलीमीटर पाऊस झाला असून जिल्हाभरात 510 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्ठीमुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस दोन्ही शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळं आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.

Solapur Rain update : सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलिमीटर इतका पाऊस

सोलापूर जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून सर्वदूर पाऊस दिसतोय. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार  जिल्ह्यात आतापर्यंत 173 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सरासरी 142 मिलिमीटर इतकी असताना अधिकचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे  सलग पाऊस सुरू असल्याने  ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत त्यांची मात्र अडचण होतेय. शहरात अनेक ठिकाणी खड्डे असल्याने  बहुतांश ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुदैवानं जिल्ह्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त प्रशासनाकडे नाही. दरम्यान सोलापूर जिल्ह्यासाठी पाण्याचे मुख्य साठा असलेले  उजनी धरण  बऱ्याच दिवसानंतर प्लसमध्ये आल्याने  व्यावसायिक आणि सर्वसामान्य देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

Hingoli Rain news : विरेगाव शिवारातील शेकडो एकर शेती पाण्या खाली 

हिंगोली : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे मागील 48 तासापासून जोरदार झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील विरेगाव शिवारात असणाऱ्या शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिके या पाण्यात वाहून जात आहेत कापूस सोयाबीन हळद यासह अन्य सर्व पिके हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या भागातील शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतीवर दुबार पेरणीचं संकट ओढावले आहे.  तरी प्रशासनाने  तत्काळ पंचनामे  करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात पावसाला सुरवात

Aurangabad Rain: औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चापानेर परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. तर बाजारसावंगीत सुद्धा दमदार पाऊस पाहायला मिळाला. तर जिल्ह्यातील वाळूज, चित्तेगाव, अजिंठा, खांमंगाव, सोयगाव, पाचोड, आडूळ, खुलताबाद, अंभई, बिडकीन भागात पावसाने हजेरी लावली आहे.

Ujani Dam Update : पुणे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण प्लसमध्ये

पुणे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे काल रात्री प्लसमध्ये आलेले आहे.  काल रात्री 9 वाजता उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा 63.25 टीएमसी इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनी धरण प्लसमध्ये आलं आहे. 7 जुलैपासून आतापर्यंत उजनी धरणात जवळपास सात टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे उजनी हे प्लसमध्ये आलं आहे. मागच्या वर्षी हे धरण 22 जुलै रोजी प्लस मध्ये आलं होतं. यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत 9 दिवस आधीच प्लस मध्ये आलं आहे.. धरणाची क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे.. सध्या  उजनी धरणात 3 टक्के जिवंत पाणी साठा आहे.  

अपघाताच्या भीतीने सिंहगड बंद करण्यासाठी जिल्हाप्रशासनाला पत्र

पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने  पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे.

Raigad Rain News : खालापूर येथील अंबा नदीवरील पुलावरून वाहतूक बंद

Raigad Rain News : खालापूर येथील अंबा नदीवरील पुलावरून वाहतूक बंद...  खोपोली - पाली रस्त्यापासून तुकसई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अंबा नदीवरील पुलावरून पाणी... छोट्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद ...

पुण्यातील कात्रजच्या जुना बोगदयाजवळ कोसळली दरड

पुण्यातील कात्रजच्या जुना बोगदयाजवळ दरड कोसळली. रस्यावर दगडे आली असून महापालिकेचे पथक रवाना झाले आहे. या घटनेत सध्या कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. 

Chandrapur News : बल्लारपूर-राजुरा महामार्ग बंद, वर्धा नदीच्या उंच पुलावरून वाहू लागले पुराचे पाणी

Chandrapur News : बल्लारपूर-राजुरा महामार्ग बंद... वर्धा नदीच्या उंच पुलावरून वाहू लागले पुराचे पाणी, वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला लागल्या वाहनांच्या रांगा, महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा मार्ग झाला बंद, अप्पर वर्धा आणि इरई धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ, पावसाने उसंत घेतली असली तरी धरणातून सातत्याने होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ

पिंपरी चिंचवडमधील शाळा अतिवृष्टीमुळं बंद, आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

पिंपरी चिंचवडमधील शाळा अतिवृष्टीमुळं बंद राहणार. त्यामुळं आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.

लातूर जिल्ह्यात संततधार, नद्या, नाल्यांना पाणी

लातूर जिल्ह्यात काल आणि आज दिवसभर संततधार होती. नद्या, नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील वांगदरी, होसूर बॅरेजेस शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पाणी नदीपात्रात सोडले जाणार असून नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे 148 प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा ३३२.४१५ दलघमी, मृतपाणीसाठा १३५.७३२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा १९६.६८३ दलघमी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी २६.१४ आहे. यातील काही प्रकल्पांतच हळूहळू जलसाठा वाढतोय.मांजरा प्रकल्प क्षेत्रावर १५१.५ मी.मी. पाऊस झाला आहे. या पावसावरच मांजरा प्रकल्पात एक टक्क्याने पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती आहे
मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीवरील बरेजेस, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी राहून येवा प्रकल्पात असाच राहीला तर प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर प्रकल्पात येणारा येवा मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीमार्गे सोडावा लागणार आहे. मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहीलेले नागरिक यांना सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभागकडून देण्यात आला आहे

Wardha Rain News : देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा मोठा फटका
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तेवढा पाऊस झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत. या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आणि जनजीवन तर विस्कळीत झालं आहेच मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या बळीराजाच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आणले आहेत. देवळी तालुक्यात सोनेगाव आबाजी परिसरात जून मध्ये काहीसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या.. पेरलेल्या बियाण्यांमधून अंकुर फुटून रोप तयार व्हायला सुरुवात झाली होती आणि शेतकऱ्याने हिरवेगार शेतीचे स्वप्न पाहिलं होतं..मात्र जुलै महिन्यात यशोदा नदीला पूर आला आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या वाहून नेल्या आहेत त्यामुळे अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे..

लोणावळ्यात सायंकाळी पाच नंतर पर्यटनाला बंदी घातली

 लोणावळ्यात सायंकाळी पाच नंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे. लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे, परिणामी भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळं पर्यटकांना ही धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागतोय.

Yavatmal Rain Updates: यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावात नदीचे पाणी

Yavatmal Rain Updates: यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपूल्ली गावात नदीचे पाणी शिरत आहे. या भागात असलेले कोल्हापुरी दरवाजे उघडे असल्याने गावात पाणी शिरत आहे. मोहपूर, फुलसावगी, डोंगरगाव या गावात असलेल्या कोल्हापुरी बंधाराचे दरवाजे उघडे असल्याने शिरले गावात पाणी शिरले आहे. 15 ते 20 कुटुंबं शेतातच राहत असल्याने त्यांचाही संपर्क तुटला आहे

Raigad Rain News: नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली येथील उल्हास नदीवरील पूल  पाण्याखाली, 30 गाव वाड्यांचा संपर्क तुटला

Raigad Rain News: नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली येथील उल्हास नदीवरील पूल  पाण्याखाली, 30 गाव वाड्यांचा संपर्क तुटला, वाहतूक पूर्णतः बंद... 

 वाहतूक पर्यायी मार्गाने  वळविण्यात आली आहे..

Thane Rain Updates : ठाणेकरांची चिंता मिटली; ठाण्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण 50 टक्के भरलं

Thane Rain Updates : बारवी धरणात आता 50 टक्के पाणी साठा तयार झालाय.ठाणे जिल्ह्यला पाणी पुरवठा करणार हे महत्त्वाचं धरण आहे. आता पर्यंत धरण परिसरात 864 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. बारवी धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महापालिका आणि पालिका त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रांना देखील पाणी पुरवठा केला जातो.

Nanded Rain Updates : नांदेड जिल्ह्यातील गोदावरी,पैनगंगा, मांजरा,मन्याड,सीता या नद्यांना पूर

Nanded Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी,पैनगंगा, मांजरा,मन्याड,सीता या नद्यांना पूर आलाय. नांदेडसह मुदखेड, उमरी, हदगाव, हिमायतनगर अर्धापुर, मुखेड या गावांमध्ये पावसाचं पाणी नागरी वस्तीत घुसलंय. आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमधील प्रमुख महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसानं नांदेड शहरातल्या रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचलंय. नालेसफाई पूर्ण न झाल्यानं पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येातयत त्यामुले शहराला तळ्याचं रूप आलंय.

Nagpur Rain Updates : विदर्भातील धापेवाड्याच्या चंद्रभागा नदीला पूर, धापेवाड्यातील चंद्रभागा नदीचं पाणी विठ्ठल मंदिरात शिरलं

Nagpur Rain Updates : काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील चंद्रभागा नदीला देखील पूर आला आहे.   जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील चंद्रभागा नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. चंद्रभागा नदीचे पाणी विठ्ठल मंदिराच्या परिसरातही शिरले आहे. आजूबाजूच्या परिसरातही नदीचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Kolhapur Rain Updates : कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम

Kolhapur Rain Updates : कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. पंचगंगेची पातळी सध्या 35 फूट 3 इंचावर पोहोचलीय. इशारा पातळीकडे वाटचाल करणाऱ्या पंचगंगेची ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्यं आपण पाहतोय. कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. कोल्हापुरातील 54 बंधारे पाण्याखाली गेलेत.

Mumbai Rain Trafic Updates : पूर्व द्रुतगती महामार्ग घाटकोपर ते सायन वाहतूक कोंडी

Mumbai Rain Trafic Updates : आज सकाळपासून मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावलेय गेल्या तीन तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा परिणाम मुंबईतल्या वाहतुकीवर झालेला दिसून येतोय. मुंबईतील दोन मोठे मार्ग म्हणजे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी दिसून येतेय. पूर्व दृतगती मार्गावर घाटकोपर ते सायन भागात वाहतूक कूर्मगतीनं सुरू आहे. तर पश्चिम दृतगती मार्गावर अंधेरी गोरेगाव, मालाड, कांदिवली या भागात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.

Chandrapur Rain Updates : चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची केली सुटका

चंद्रपूर : चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची केली सुटका, विरुर पोलीस ठाण्यातील पथकाची धाडसाची कामगिरी... ही बस राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस पुढे नेली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडली. माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच सुरु केले बचाव अभियान. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून पुरुष वृद्ध लहान मुले आणि महिलांना काढले बाहेर, दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे केले रवाना, बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून, चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे

माटुंगा डॉन बॉस्को येथे नाठालाल पारेख रस्त्यावर झाड पडले, वाहतूक तात्पुरती वळवली

माटुंगा डॉन बॉस्को येथे नाठालाल पारेख रस्त्यावर झाड पडले असून चार रस्त्याच्या दिशेने वाहतूक तात्पुरती वळविण्यात आलेली आहे, बीएमसी कर्मचारी झाड कापून बाजूला घेत असून हायवे पोलिस वाहतूक नियंत्रित करीत आहे, वाहतूक सुरळीत चालू आहे.

Palghar News : नदीच्या जीवघेण्या प्रवाहातून विद्यार्थ्यांचा टायरमधील ट्यूबच्या सहाय्याने जीव मुठीत घेऊन प्रवास

नदीच्या वाहत्या पाण्याच्या धोकादायक प्रवाहावर टायर मधील ट्यूबच्या साहाय्याने शाळकरी विद्यार्थिनी प्रवास करत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे .  विक्रमगड मधील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा गावातील हे विदारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे . म्हसेपाडा या गावाला गारगाई आणि  राखाडी या दोन्ही नद्या पावसाळ्यात चारही बाजूनी वेढा घालत असून गावात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग या गावातील ग्रामस्थांना नाही . नदीवर एक छोटा बंधारा आहे मात्र त्याची उंची कमी असल्याने तो पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली असतो . त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना वाहनाच्या टायरमधील ट्युबचा आधार घेऊन हा काही मीटर अंतराचा जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय . गारगाई आणि राखाडी या दोन्ही नद्यांचा प्रवाह अतिशय तीव्र असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक या विद्यार्थ्यांची नदीपत्रातून ट्यूबच्या साहाय्याने ये - जा करण्यासाठी मदत करतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून या गावाला जोडणाऱ्या पुलाची मागणी असताना देखील जिल्हा प्रशासनाने येथील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत . 

Mumbai Rain Updates:  गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी

Mumbai Rain Updates:  मुंबईचा सकाळपासूनच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती दिवसभर राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे सध्याची गेटवे ऑफ इंडिया परिसरातील दृश्य पाहिली तर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे दृश्यमानता देखील कमी झालेली आहे या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक भेटी देत असतात मात्र मात्र या ठिकाणी आज पर्यटकांची संख्या कमी दिसत आहे.

Palghar Rain News : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर पालघर तालुक्यातील माकुंसार गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे

Chandrapur Rain News : चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात
चंद्रपूर शहरातल्या रहमत नगर भागात इरई नदीचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जवळपास 60 ते 70 घरात नदीचे पाणी शिरले असून लोकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतलाय. इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दारे 1 मीटरने उघडल्याने इरई नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. नदीचे पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. इरई धरणाच्या कॅचमेंट एरियात म्हणजे चिमूर-चारगाव बंधारा क्षेत्रात मुसळधार पावसाने इरई धरणात पाण्याची महत्तम आवक होतेय. त्यामुळे इरई नदीच्या पात्रालागत वास्तव्याला असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. इरई धरणातून सध्या 490 क्यूसेक प्रति सेकंद इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग इरई नदीत करण्यात येतोय.
 
काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे... विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील चंद्रभागा नदीला देखील पूर आला आहे.   जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे... विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील चंद्रभागा नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे... चंद्रभागा नदीचे पाणी विठ्ठल मंदिराच्या परिसरातही शिरले आहे...  आजूबाजूच्या परिसरातही नदीचे पाणी शिरले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Mumbai Latest News:  मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथ, घाटकोपर ते सायन वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Latest News:  मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथ गतीने पाहायला मिळते . सायन दादर भागात सखल भागात पाणीच साचल्याने घाटकोपर ते सायन वाहनांच्या लांबच लांब रांगा 

ठाणे स्थानकात लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वे ठप्प, लोकलमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने लोकल पडली बंद 

ठाणे स्थानकात लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वे ठप्प, लोकलमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने लोकल पडली बंद. या लोकलला आता बाजूला काढले जाईल, त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो, त्यामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील स्लो लोकल उभ्या आहेत 

पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी, घाटकोपर ते सायन मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी, घाटकोपर ते सायन मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

IMD कडून मुंबई आणि आसपासच्या भागासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

IMD कडून मुंबई आणि आसपासच्या भागासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, मुंबई, कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई येथे दुपारी 1 वाजेपर्यंत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात पाण्याची वाढ

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधून वाहणाऱ्या नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे

मराठवाड्यातील मोठ्या धरणाची स्थिती : 

मराठवाड्यातील मोठ्या धरणाची स्थिती : 

जायकवाडी: 43.25
विष्णुपुरी : 84.61
माजलगाव: 33.97
सिदेश्वर : 12.19
येलदरी: 58.17
मांजरा: 28.22
निम्न तेरणा: 52.03
निम्न दुधना :68.34
पेनगंगा: 57.86
मानार: 62.13
सीना कोळेगाव: 16.42
 
मराठवाड्यात एकूण उपलब्ध पाण्याची टक्केवारी 49.37 टक्के आहे.

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. 
  प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.आपत्ती व्यवस्थापना संदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास व मदतीसाठी ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्रमांक १०७७ चा वापर करावा.

 आर. विमला 
जिल्हाधिकारी, नागपूर

संगमेश्वर तालुक्यातील उक्षी धबधबा वेधतोय लक्ष
निसर्ग संपन्न असलेल्या कोकणातले निसर्ग सौंदर्य  पावसाळ्यात अधिक फुलते. हिरवा नटलेला परिसर आणि उंचच कड्या कपाऱ्यामधून फेसाळत कोसळणारे धबधबे सर्वांचं लक्ष वेधून घेतात. दरम्यान अशाच पैकी एक म्हणजे  संगमेश्वर तालुक्यातील उक्षी धबधबा. कोकण रेल्वे मार्गाला लागूनच असलेला हा धबधबा कोकण रेल्वे प्रवास करणारा प्रवाशांसाठी देखील आकर्षण. सध्या हा धबधबा देखील सध्या चांगलाच प्रवाहित झाला असून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

मुसळधार पावसाने नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवली
नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवली आहे. आतापर्यंत 6 tmc पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी आलाय सकाळी 9 वाजता गंगापूर धरणाचा विसर्ग 7 हजार 128 क्यूसेक करण्यात आलाय, दारणा धरणातून 8 हजार 846 क्यूसेक वेगाने पाणी प्रवाहित होत आहे तर नांदूर मध्यमेशवर बंधाऱ्यातून 58 हजार 697 वेगाने विसर्ग सुरू आहे त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असला तरी गोदावरीसह  जिल्ह्यातील  इतर नद्यांची पूरस्थिती अद्यापही कायम आहे,

. जिल्ह्यातील 24 धरणाचा उपयुक्त पाणीसाठा  69 टक्यावर पोहचला आहे मागील वर्षी याच कालावधीत केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक होता,  सध्या जिल्ह्यातील 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेशवर बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील सहा दिवसापासून पावसाचा जोर कायम

यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील सहा दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे.  सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी मुकुटनब- पाटण मार्गावरील वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. राळेगाव तालुक्यातुन खैरी माढेली मार्ग वरोरा चंद्रपूर जिल्हाल जोडणारा कोसारा वर्धा नदीवरील पुल पाण्याखाली आल्याने चन्द्रपुर मार्ग बंद झाला. तर तर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले तेलंगणा बॉर्डरवरील दिग्रस गावाजवळ पूलावरून पाणी जात असल्याने हा तेलंगणाकडे जाणारा मार्ग पूर्ण झाला आहे. या सततच्या या सहा दिवसापासून च्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास पंधराशे ते दोन हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आलेली आहे. एस टी महामंडळाकडून जवळपास जिल्ह्यातील दहा बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प हे 42 टक्के भरलेले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी व महसूल विभागला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. 

Mumbai Local News Update : सर्वच सेक्शनमध्ये सतत पाऊस, सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु मात्र काही गाड्या विलंबाने 

Mumbai Local News Update : सर्वच सेक्शनमध्ये सतत पाऊस पडत आहे. सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु मात्र, काही गाड्या विलंबाने 

Thane Rain : सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे ठाणे स्थानकात काही प्रमाणात पाणी साचले

Thane Rain : सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे ठाणे स्थानकात काही प्रमाणात पाणी साचले आहे, अजूनही पाणी पातळी खाली आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीवर परिणाम नाही, मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर पाणी पातळी वाढून लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, सध्या मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरू आहे.

वर्धा येथील पवणुर गावाजवळील वन विभागाचा वनराई बंधारा फुटला

वर्धामधील पवनुर गावाजवळील वन विभागाचा वनराई बंधारा फुटल्यामुळे आंजी ते पवनुर रस्ता बंद झाला आहे. पवनुर येथील ३० -३५ घरांमध्ये तर खानापुर येथील ५ ते ६ घरे व कामठी येथील ८ घरांमध्ये पाणी शिरले आहे. तहसीलदार वर्धा घटनास्थळावर पोहचले असून पोलीस विभागास बोलावण्यात आले असल्याबाबत तहसिलदार वर्धा यांनी कळविले आहे. 

Kolhapur Rain update : कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम, इशारा पातळीकडे वाटचाल

 कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. पंचगंगेची पातळी सध्या ३५ फूट ३ इंचावर पोहोचलीय. इशारा पातळीकडे वाटचाल करणाऱ्या पंचगंगेची ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली दृश्यं आपण पाहतोय... कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरु आहे. कोल्हापुरातील ५४ बंधारे पाण्याखाली गेलेत.

शेतात हजारो बेडूक शेतात, बेडकांच्या आवाजाने परिसर घुमला

सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील जंगलात दिसणारा बायकलर म्हणजेच हायड्रोफिलॅक्स बेडकू सध्या सातारा धोम धरणाच्या जवळील असलेल्या शेतातील डोंगरातील उफाळा फुटलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. हजारोंच्या संख्येने दिसणाऱ्या या बेडकांच्या कळपामुळे परिसरात मात्र यांच्या आवाजाने परिसर घुमू लागला आहे. जंगलामध्ये प्रामुख्याने दिसणारा हा बेडूक सध्या या धरणाजवळील शेतांमध्ये आल्यामुळे थोडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या जातीचा हा बेडूक शेतकऱ्यांना तसा उपयुक्तच असतो कारण शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या उंदरांवर होणाऱ्या इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गापासून वाचवतो,असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.  

दरवर्षी वाडा भिवंडी महामार्गावर काही भागांमध्ये पुराचं पाणी साचतं,  प्रशासनाचे दुर्लक्ष 

पालघर : वाडा भिवंडी महामार्गावर पूरजन्य परिस्थिती, दरवर्षी वाडा भिवंडी महामार्गावर काही भागांमध्ये पुराचं पाणी साचतं,  प्रशासनाचे दुर्लक्ष. वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस जवळ नेहमीच पाणी साचण्याचा पुराचे पाणी साचाण्याचा प्रकार होत असून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही ठोस उपायोजना नाही

वसईच्या वाघरल पाडा परिसरात दरड कोसळली;  4 जणांची सुटका, दोन जण अजूनही दरडीखाली

वसईच्या वाघरल पाडा परिसरात दरड कोसळली;  4 जणांची सुटका, दोन जण अजूनही दरडीखाली

दुर्घटनास्थळी पोलीस
आणि अग्निशमन
दलाकडून बचावकार्य

Big Breaking : अलमट्टी धरणातून 1 लाख 4 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु, संभाव्य धोका लक्षात घेता पाण्याचा विसर्ग सुरु

Big Breaking : अलमट्टी धरणातून 1 लाख 4 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु, संभाव्य धोका लक्षात घेता पाण्याचा विसर्ग सुरु

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासू सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासू सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. असून घरासह घरातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस,नदी नाल्यांना पूर,महामार्गावरील पूल तुटून गावांचा शहरांशी संपर्क तुटला तर अनेक गावांना पुराचा वेढा.

गेल्या आठ दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात संतधार पाऊस बरसतोय.तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील गोदावरी,पैनगंगा, मांजरा,मन्याड,सीता नदी ह्या दुथडी भरून वाहत आहेत.दरम्यान जिल्ह्यात व आसना नदी परिसरातील वरील भागात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहतेय .त्यामुळे नांदेड शहरास जोडणारे प्रमुख राष्ट्रीय  महामार्गांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड-मालेगाव राष्ट्रीय महामार्ग, नांदेड -वसमत राज्य महामार्ग,नांदेड -पूर्णा राष्ट्रीय महामार्ग ,किनवट नांदेड राष्ट्रीय महामार्ग राहदरीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी होऊन रस्त्यांना तळ्याचे रूप आलेय. दरम्यान नांदेड महापालिकेने मान्सून पूर्व नाले सफाई न केल्याने शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर  गुडघाभर पाणी साचलेय,त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा उडालेत. पहिल्याच पावसात नाले सफाई अभावी शहराची अशी गटार गंगा झाल्याने नांदेड वाघाळा महापालिकेचे पितळ उघडे पडलेय. तर नांदेड जिल्ह्याची तहान भागवणारा एकमेव प्रकल्प ह्या दमदार पावसामुळे 80 टक्के भरलाय. तर जिल्ह्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास 200 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगाव,अर्धापुर,भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक चोटीमोठ्या पुलावरून पाणी जाऊन व वाहून गेल्याने या  महामार्गावरील वाहतूकीचा मात्र खोळंबा झालाय. तर चिखली, पिंपळगाव, कोंढा,निळा, एकदरा,आलेगाव,देगाव, कासारखेडा, गणपूर, मुदखेड यासह अनेक गावांना पुरामुळे वेढा पडला असून मुदखेड, नांदेड, अर्धापुर ,उमरी, मुखेड, बिलोली, हदगाव या शहरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेय.

Nagpur : नागपूरच्या गोरेवाडा धरणाचे सर्व चारही गेट उघडले

नागपूरच्या गोरेवाडा धरणाचे सर्व चारही गेट उघडण्यात आले आहे... गोरेवाडा धरण पूर्णपणे भरल्यामुळे स्वयंचलित गेट आज सकाळपासून उघडले आहे...गोरेवाडा मधून पाणी पुढे पिवळी नदी च्या माध्यमातून वाहते...

गेले तीन-चार दिवस गोरेवाडा मध्ये येऊन मिळणाऱ्या खडक नाल्याच्या परिसरात तसेच गोरेवाडा धरणाचे पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे यंदा 13 जुलैलाच गोरेवाडा धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे.

Chiplun Ratnagiri Rain : चिपळूण  तालुक्यातील नांदीवसे येथील वस्तीच्या वरील डोंगराला पडल्या भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावऱण.. 

Chiplun Ratnagiri Rain : चिपळूण  तालुक्यातील नांदीवसे येथील वस्तीच्या वरील डोंगराला पडल्या भेगा, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावऱण.. या वस्तीतील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याचे आदेश.. 

डोंगराला तडा गेल्याने या डोंगराची पाहणी करण्याची मागणी.. 

कोकणातील मुसळधार पावसाचा फटका या डोंगराला बसलाय.. 

Hingoli Rain Update: हिंगोलीत गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस, मधुमती नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

हिंगोलीत गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. औंढा नागनाथ तालुक्यामधील येहळेगाव सोळंके गावाजवळून  वाहणाऱ्या मधुमती नदीला पूर आलाय. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे ओढा पार करण्यासाठी ग्रामस्थ जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळतंय. या पावसामुळे शेतीचंही नुकसान झालंय.. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय.. 

नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं केळवद परिसरातील कपिलेश्वर मंदिर परिसारात मोठ्या प्रमाणात पाणी

विदर्भातही पावसाचा जोर आहे. नागपूरसह अनेक ठिकाणी रात्रभर पाऊस कोसळतोय. नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानं केळवद परिसरातील कपिलेश्वर मंदिर परिसारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय..  जोरदार पाऊस झाल्यानं मंदिर परिसरातून मोठे प्रवाह देखिल वाहत आहेत.

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, मध्य, हार्बर मार्गावर लोकल उशिराने, प.रेल्वेची वाहतूक सुरळीत, पावसामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरु

परभणीत सलग सहाव्या दिवशीही सूर्यदर्शन नाही, पावसाची संतातधार कायम, 18 गावांचा संपर्क तुटला

Parbhani Rain : मागच्या सहा दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची संतातधार कायम आहे. जिल्हावासियांना 6 दिवस झाले आज सूर्यदर्शनही झाले नाही. सातत्याने पाऊस सुरु असल्याने एकीकडे पीक बहरली असली तरी काही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे छोट्या मोठ्या नदी नाल्यांनाही पाणी आले. पालम तालुक्यातील लेंडी, गळाटी नदीला पूर आल्याने फळा, आरखेड, घोडा, सोमेश्वर, सायाळ, उमरथडी, पूयणी, आडगाव, वणभुजवाडी, तेलजापूर ही दहा आणि सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला पूर आल्याने लासिना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गोळेगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लोहीग्राम या आठ गावांचा संपर्क तुटला तुटलेला आहे. येलदरी, लोअर दुधना प्रकल्पातील पाणी पातळीत आजही वाढ आहे.

Gadchiroli Rain : गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय.

गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसलाय... मुख्य बाजारपेठेपर्यंत पुराचं पाणी शिरलंय.. त्यामूळे भामरागड आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे..प्रशानाने खबरदारी म्हणून वेळेतच  लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते... दर वर्षी भामरागड शहरासह तालुक्यातील 112 गावांना पुराचा फटका बसत असतो आणि त्यामुळे  मुख्यालयाशी थेट संपर्क तुटत असल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते..तर दुसरीकडे प्रणिता आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील १२ गावांना खाली करण्याचे आदेश काल जिल्हा प्रशासनाने दिले होते.. सध्या स्थिती सामान्य असून स्थानिक प्रशासन अलर्ट वर आहे

Hingoli Rain News: हिंगोलीत गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस

हिंगोलीत गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. औंढा नागनाथ तालुक्यामधील येहळेगाव सोळंके गावाजवळून  वाहणाऱ्या मधुमती नदीला पूर आलाय. या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे ओढा पार करण्यासाठी ग्रामस्थ जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळतंय. या पावसामुळे शेतीचंही नुकसान झालंय.. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.. अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय..

Nashik Rain : नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती कायम

नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे. इगतपुरीतील दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झालाय. त्यामुळे  दरणातील  विसर्ग  8 हजार 846 एवढा कमी करण्यात आला आहे. मात्र गंगापूर धरणातील विसर्ग 10 हजार 35 क्यूसेक एवढा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पात्रातील अनेक लहानमोठी मंदिरं आजही पाण्याखाली आहेत.

मुंबईत 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी 4.68 मीटर उंचीच्या लाटांचा अंदाज

Mumbai Rains : मुंबईत सलग 6 दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त उंच लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास पेक्षा जास्त असेल. मुंबईत 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी समुद्रात 4.68 मीटर उंचीच्या लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत ऑरेंज आणि रेड अलर्ट दरम्यान, नागरिकांना सकाळी 10 नंतर समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी नाही. मुसळधार पावसामुळे अपघात होऊ शकतो म्हणूनच मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत. मुंबईत काल रात्री अधूनमधून पाऊस पडत होता. आज सकाळपासून काही भागात हलका पाऊस पडेल. सध्या मुंबईतील काही भागात संततधार सुरु आहे. दिलासादायक बाब म्हणजे कुठेही पाणी साचलेलं नाही.

सिंधुदुर्गात पावसाची संततधार, तिलारी धरणातून 5 हजार 623 क्युसेक्स विसर्ग सुरु

Sindhudurg Rains : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरु असून जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्याने बळीराजा शेतात रमला आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे दोडामार्ग मधील आंतरजिल्हा मध्यम प्रकल्प असलेलं तिलारी धरण 85 टक्के भरले आहे. सध्या धरणातून एकूण 5 हजार 623 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात पाणीच पाणी, आठ दिवसापासून पावसाची संततधार कायम 
हिंगोली जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत,कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यामधील येहळेगाव सोळंके गावाजवळून  वाहणाऱ्या मधुमती नदीला पूर आला आहे. रात्रीपासून  सुरू असलेल्या पावसाने अनेक गावाचा संपर्क तुटला,ओढा पार करण्यासाठी नागरिक लावतायत जीवाची बाजी लावत असताना पाहायला मिळत आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास करताना  दिसून येतोय . सततच्या पावसामुळं पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण तयार,अतिवृष्टीमुळे अनेक भागात दुबार पेरणी करावी लागेल अशी चिन्हं आहेत
औरंगाबादसह (Aurangabad) जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; जायकवाडी धरणाची आवक वाढली

मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम असणार असून, आज औरंगाबादसह जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहे.

परभणीत (Parbhani) सलग पाचव्या दिवशी संततधारा

परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसतोय. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात ही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मूर पाऊस यंदा पडतोय. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. तसेच येलदरी आणि लोअर दूधना प्रकल्प क्षेत्रात ही चांगला पाऊस होत असल्याने येलदरीत 2.14 टक्के एवढा पाणी साठा वाढलाय तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) पावसाची उसंत

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत होती. या नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर इतकी आहे. पण सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

लोणावळ्यात (Lonawala) उच्चांकी पाऊस

लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला. इथं गेल्या चोवीस तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत 1522 मिलिमिटर पाऊस बरसलाय. त्यापैकी गेल्या सहा दिवसातंच 952 मिलिमिटर पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत. 

वाशिममध्ये (Washim) पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर पावसाची हजेरी लावली असून अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. कारंजा तालुक्यातील पाऊस जास्त पडत असला तरी मात्र जिल्ह्यात कुठेही  गावातील पावसाने संपर्क तुटलेला नाही. मात्र चांगला पाऊस बरसत असल्याने बळीराजा मात्र आंनदी आहे

कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात (Sangli) 

संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सकाळी 18 फुटापर्यंत गेलेली दिसून आली. अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.

भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरण 50 टक्के भरली (Ahmednagar Rain)

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचा वेग वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण निम्मे भरले आहेत. तसेच अकोले तालुक्यातील टिटवी लघू पाटबंधारे प्रकल्प सोमवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. या जलाशयाची साठवण क्षमता 303 दलघफू आहे. टिटवी जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून निळवंडे धरणात नवीन पाणी येऊ लागलं आहे. गेल्या आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक छोटी धरणं ओव्हरफलो झाली आहेत. 

यतमाळमध्ये (Yavatmal) संततधारा सुरू, अर्णी शहरात पाणी शिरले

यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात काल संध्याकाळपासून सतंतधार पाऊस सुरू आहे. पुसद दहागाव जवळील पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने रास्ता बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी याच पुलावर बस पाण्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. शासनाने नवीन पूल बांधला पण त्याबाजूने रस्त्यावर पाणीच पाणी आहे. उमरखेड ढाणकी झाडगाव उजाड जवळ असलेल्या नाल्यास पाणी आल्याने हा रस्ताही बंद करण्यात आला.

दोन दिवसापासून आर्णी शहरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्री पासून पावसाचा चांगलाच जोर वाढल्याने शहरातील अरूनावती नदी दोन्ही थड्या भरून वाहत आहे. अशातच या नदीचा प्रवाहाचे पाणी नाल्यात आल्याने नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. 

बारामती (Baramati) परिसरात दमदार पाऊस

इंदापूर शहरासह तालुक्यामध्येही हलक्या व मध्यम स्वरूपात पावसानं हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र मागच्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने उजनी धरणात देखील साडेपाच टीएमसी पाणी साठले आहे. 

मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Mumbai Rain)

मुंबईसह उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत मुसधळार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा अद्याप मुंबई लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. लोकल सेवा सुरळीत सुरु आहे.

गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट (Gadchiroli Rain Updates)

मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे.

वर्धा (Wardha) जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14 जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मिमि म्हणजे 42.9 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झालेलं आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरण 11 जुलै रोजी 60.36 टक्के भरलेले असून, सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या 72 तासांत येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडू नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले असून, त्यामधून 178.73 (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सूरु असल्याने वर्धा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

खडकवासला (khadakwasla Dam) 100 टक्के भरलं, 5992 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू

मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) क्षमतेच्या 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. आणखी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सुरुवातीला सुमारे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. आज दुपारी 12 वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून  5992 क्युसेक करण्यात येत आहे.

पुणे शहरासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट (Pune Rain Update)

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 30 टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. 46000 हेक्टरवर पिकाची लागवड झाली आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पीक लागवडीचं प्रमाण वाढणार आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पालघरमध्ये (Palghar) दोन दिवस अतिवृष्टी, रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार  दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहे

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. आताच्या माहितीनुसार  ताज्या रडार आणि सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

यवतमाळमध्ये (Yavatmal) संततधारा सुरू, अर्णी शहरात पाणी शिरले

यवतमाळमधील उमरखेड तालुक्यात काल संध्याकाळपासून सतंतधार पाऊस सुरू आहे. पुसद दहागाव जवळील पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने रास्ता बंद करण्यात आला आहे. मागील वर्षी याच पुलावर बस पाण्यात पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. शासनाने नवीन पूल बांधला पण त्याबाजूने रस्त्यावर पाणीच पाणी आहे. उमरखेड ढाणकी झाडगाव उजाड जवळ असलेल्या नाल्यास पाणी आल्याने हा रस्ताही बंद करण्यात आला.

दोन दिवसापासून आर्णी शहरात जोरदार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले. मध्यरात्री पासून पावसाचा चांगलाच जोर वाढल्याने शहरातील अरूनावती नदी दोन्ही थड्या भरून वाहत आहे. अशातच या नदीचा प्रवाहाचे पाणी नाल्यात आल्याने नाल्यांना पूर आला आणि पुराचे पाणी शहरात शिरले. 

भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरण 50 टक्के भरली (Ahmednagar Rain)

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचा वेग वाढल्याने भंडारदरा आणि निळवंडे हे दोन्ही धरण निम्मे भरले आहेत. तसेच अकोले तालुक्यातील टिटवी लघू पाटबंधारे प्रकल्प सोमवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला. या जलाशयाची साठवण क्षमता 303 दलघफू आहे. टिटवी जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने त्यातून निळवंडे धरणात नवीन पाणी येऊ लागलं आहे. गेल्या आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या भंडारदऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक छोटी धरणं ओव्हरफलो झाली आहेत. 

कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढण्यास सुरुवात (Sangli) 

संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढू लागली आहे. कृष्णेची पाण्याची पातळी आज सकाळी 18 फुटापर्यंत गेलेली दिसून आली. अद्याप कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू नसला, तरी देखील केवळ नदीच्या पात्रात पडणाऱ्या पावसाने ही पाणीपातळी वाढली आहे. दुसरीकडे मागील आठवड्याभरापासून चांदोली धरण परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 50 टक्के भरले आहे.

वाशिममध्ये (Washim) पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात सकाळपासून सर्वदूर पावसाची हजेरी लावली असून अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. कारंजा तालुक्यातील पाऊस जास्त पडत असला तरी मात्र जिल्ह्यात कुठेही  गावातील पावसाने संपर्क तुटलेला नाही. मात्र चांगला पाऊस बरसत असल्याने बळीराजा मात्र आंनदी आहे

लोणावळ्यात (Lonawala) उच्चांकी पाऊस

लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी पाऊस झाला. इथं गेल्या चोवीस तासात 220 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत 1522 मिलिमिटर पाऊस बरसलाय. त्यापैकी गेल्या सहा दिवसातंच 952 मिलिमिटर पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागलेत. 

रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) पावसाची उसंत

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार बॅटिंग केली. पण सध्या मात्र पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत होती. या नदीची इशारा पातळी पाच मीटर असून धोका पातळी सात मीटर इतकी आहे. पण सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. पण असं असलं तरी हवामान विभागांना दिलेला पावसाचा इशारा पाहता नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क आहे. सध्या जिल्ह्यामध्ये NDRF च्या टीम देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

परभणीत (Parbhani) सलग पाचव्या दिवशी संततधारा

परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. येलदरीत 2.14 टक्के तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र मागच्या सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसतोय. यामुळे पीक चांगली बहरली असून प्रकल्पातील पाणी साठ्यात ही चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना हवा असलेला मूर पाऊस यंदा पडतोय. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. तसेच येलदरी आणि लोअर दूधना प्रकल्प क्षेत्रात ही चांगला पाऊस होत असल्याने येलदरीत 2.14 टक्के एवढा पाणी साठा वाढलाय तर लोअर दुधना प्रकल्पात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

औरंगाबादसह (Aurangabad) जालना जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट; जायकवाडी धरणाची आवक वाढली

मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम असणार असून, आज औरंगाबादसह जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.