एक्स्प्लोर

पालघरमध्ये पहिल्यांदाच ट्रायथलॉन शर्यतीचं आयोजन

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये पहिल्यांदाच ट्रायथलॉन आणि ड्युएथलॉन शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. पालघर जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन आणि आयर्नफिट इंटरनॅशनलच्या वतीनं आयोजित ट्रायथलॉन शर्यतीत सेनादलाच्या गुरुदत्त घरतनं पुरुषांचं, तर नाशिकच्या अनुजा उगलेनं महिलांचं विजेतेपद पटकावलं. विरारमध्ये रविवारी आयोजित केलेल्या ट्रायथलॉन शर्यतीत दीड किलोमीटर पोहणं, 40 किलोमीटर्स सायकलिंग आणि 10 किलोमीटर्स धावणं असं तिहेरी आव्हान होतं. केवळ सायकलिंग आणि रनिंगच्या एकत्रित अंतरासाठी ड्युएथलॉनची स्वतंत्र शर्यत होती. पण मुख्य आकर्षण हे ट्रायथलॉनचंच होतं. मुंबईसह पालघर जिल्ह्यातल्या तरुणांमध्ये ट्रायथलॉनची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालघर जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन व आयर्नफिट इंटरनॅशनलच्या वतीनं ट्रायथलॉन आणि ड्युएथलॉन शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. तीन आंतरराष्ट्रीय आर्यनमन ट्रायथलॉन शर्यतींचे फिनिशर असलेल्या हार्दिक पाटील यांनी त्यासाठी खास पुढाकार घेतला होता. सेनादलाच्या गुरुदत्त घरतनं पुरुषांच्या ट्रायथलॉन शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. तर नाशिकच्या सोळा वर्षांच्या अनुजा उगलेनं महिलांची ट्रायथलॉन जिंकून महाराष्ट्राचं नाव राखलं. मॅरेथॉनपाठोपाठ महाराष्ट्रात आता ट्रायथलॉन शर्यती लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. आणि याच शर्यतींमधून महाराष्ट्राला चॅम्पियन ट्रायअॅथलिट्सही मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Solapur News :  SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
SIR च्या कामात हलगर्जीपणा अन् टाळाटाळ भोवली; सोलापूर महापालिकेतील लिपिकविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापुरात पावसाचा हाहा:कार! पंचगंगेची पातळी 22 फुटांवर, मुसळधार पावसाने राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे पाण्याखाली; प्रशासन अलर्ट मोडवर
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा, विकेंडला रेड अलर्ट
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Eknath Shinde Health: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना कामाचा अतिताण, उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोठी बातमी: एकनाथ शिंदे अचानक रुग्णालयात दाखल, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Embed widget