एक्स्प्लोर

आगीत आई, पत्नीसह दोन मुलं गमावली, जळीतग्रस्तांच्या मदतीला धावली 'जिजाऊ'

मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथे होळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास अनंता बाळू मौळे यांच्या राहत्या घराला व दुकानाला आग लागली. त्या घटनेत त्यांच्या परिवारातील त्यांची आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका आनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे,मुलगा कृष्णा अनंता मौळे यांचा या दुर्दैवी घटनेत आगीमध्ये होळपळून मृत्यू झाला.

पालघर : अनंता मौळेंनी आगीत सर्वच गमावलं. राहतं घर. उपजीविकेचे साधन असणारे दुकान. घरातील जीवलगही. आई, पत्नी. दोन मुलंही. त्यांच्या सोबत उरलीत दोन मुलं. ती ही मृत्यूशी झुंज देत आहेत. जेव्हा सर्वस्व हरवल्यावर सोबत कुणीच नव्हतं, तेव्हा त्यांच्या मदतीला धावली 'जिजाऊ सामाजिक, शैक्षणिक संघटना'. 'जिजाऊ'चे संस्थापक निलेश सांबरेंना मौळेंवरील आपत्तीचं कळताच ते स्वत: तिथे पोहोचले. तात्काळ मदत तर केलीच पण 'जिजाऊ'तर्फे घर-दुकान बांधून देण्याची जबाबदारीही घेतली. अनंता मौळेंचं सारं जीवनच राख झालं असं वाटत असतानाच पुन्हा जगण्याचा आधार मिळाला.

मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथे होळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास अनंता बाळू मौळे यांच्या राहत्या घराला व दुकानाला आग लागली. त्या घटनेत त्यांच्या परिवारातील त्यांची आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका आनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे,मुलगा कृष्णा अनंता मौळे यांचा या दुर्दैवी घटनेत आगीमध्ये होळपळून मृत्यू झाला. त्यांची मुलगी अश्विनी अनंता मौळे, मुलगा भावेश अनंता मौळे यांच्यावर नाशिक येथे उपचार चालू आहेत.

अनंता बाळू मौळे हे ब्राम्हणपाडा येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित सीबीएसई शाळेच्या समितीचे अध्यक्ष व ब्राम्हणपाडा जिजाऊ शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल कळताच 'जिजाऊ'च्या निलेश सांबरे यांनी त्वरित हालताल केली. 'जिजाऊ' तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला. तातडीची मदत म्हणून रोख दोन लाख रुपये देण्यात आले. जळून खाक झालेले दुकान व घर 17 एप्रिलपर्यंत पूर्णपणे नवीन बांधून देण्याचाही शब्द दिला.

श्रीमंतांसारखंच चांगलं दर्जेदार शिक्षण गरीबांनाही मिळालंच पाहिजे या शिक्षण प्रसार धोरणातून ब्राह्मणपाड्यात सीबीएससी शाळा आहे. सर्वांना मोफत शिक्षण देणाऱ्या शाळेच्याच समितीचे अनंता मौळे कार्यरत असतात. त्यांना जिजाऊने केलेल्या मदतीबद्दल सभोतालच्या गावांमध्येही प्रशंसा करण्यात येत आहे.  

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?
Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?
श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संताप, आतापर्यंत काय काय घडलं?
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News: ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
ब्रेक फेल झालेल्या ट्रकची इकोला धडक; कारचा चक्काचूर, 4 जणांचा मृत्यू, नाशिकच्या सावळघाटातील घटना
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमीत साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
Embed widget