एक्स्प्लोर

पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे, योगी आदित्यनाथ, पृथ्वीराज चव्हाणांची सभा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा दिवस जस जसा जवळ येत आहे, तसा निवडणूक प्रचारही जोर धरु लागला आहे.

मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा दिवस जस जसा जवळ येत आहे, तसा निवडणूक प्रचारही जोर धरु लागला आहे. आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षातील नेतेही आता प्रचाराच्या रिंगणात उतरताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत. त्यांची सभा आज संध्याकाळी 5 वाजता वसंत नगरी ग्राऊंड वसई पूर्व येथे होणार आहे. तर भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित केली आहे.  योगी आदित्यनाथ यांची सभा आज संध्याकाळी 6 वाजता मनवेलपाडा तलाव विरार पूर्व याठिकाणी होणार आहे. काँग्रेसनेदेखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचारात उतरवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आज दुपारी दीड वाजता मंगल कार्यालय वीर सावरकरनगर नारंगी, विरार पूर्व याठिकाणी सभा घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत तर योगी आदित्यनाथ हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यासाठी ही प्रचारसभा घेत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. सर्वच पक्षांसाठी ही पोट निवडणूक चुरशीची असली तरी शिवसेना आणि भाजपने मात्र ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधन झाल्याने पालघरमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. एकाच दिवशी सभा उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ यांची  बुधवारी 23 मे रोजी जाहीर सभा होणार आहे. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदार आहेत. मतदारांना आवाहन करण्यासाठी भाजपनं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नालासोपाऱ्यात सभा घेत, शिवसेनेसह स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका केली होती. या सभेसाठीही भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांची उपस्थिती होती.  इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला   दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, 23 मे री पोलिंसांच्या अधिक तुकड्या तैनात करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे-मुख्यमंत्री आमने-सामने पालघर पोटनिवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनीही उडी घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पालघरमध्ये दोन जाहीर सभा होणार आहेत. नालासोपाऱ्याला 23 मे रोजी तर तर दुसरी सभा भोईसरला 25 मे रोजी होणार आहे. पालघर पोटनिवडणूक भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा,काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. 28 मे रोजी पोटनिवडणूक पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होईल. संबंधित बातम्या  पालघर पोटनिवडणूक: उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ आमने-सामने  इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकूरांवर हल्ला   भाजपकडून माझ्या पतीच्या फोटोंचा गैरवापर, जयश्री वनगांची तक्रार  पालघर पोटनिवडणूक: शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळला 

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget