एक्स्प्लोर

पालघर पैसे वाटप: सेनेचे दिग्गज नेते रात्री 2 वा. डहाणू पोलिसात

शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी रात्री 2 वा. डहाणू पोलिसात धाव घेतली. पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने, शिवसैनिकांनी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला.

पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. कारण मतदारांना पैसे वाटप करणाऱ्यांवर 12 तासानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी रात्री 2  वा. डहाणू पोलिसात धाव घेतली. पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने, शिवसैनिकांनी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. खासदार अनिल देसाई , खासदार श्रीकांत शिंदे , आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा यांच्यासह शेकडो शिवसैनिक डहाणू पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. जर गुन्हा दाखल झाला नाही, तर पालघर बंदची हाक देऊ, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे . उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लीप सादर  पैसै वाटप प्रकरणात पोलीस केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करत असल्यानं शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पहाटे 6 वाजेपर्यंत हे नाट्य रंगलं. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना वाद प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिघळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. पालघरमध्ये शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा हे उमेदवार आहेत तर भाजपकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित हे मैदानात आहेत. त्यामुळे आता शिवसेनेच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. पैसे वाटणारे भाजपचे कार्यकर्ते? पालघरमध्ये भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. काल पालघरमधील रानशेत भागात शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं. त्यावेळी पैसे वाटणाऱ्यांनी आपल्याला हे पैसे भाजपच्या नेत्यांनी दिल्याची कबुली दिली. भाजपचे शहराध्यक्ष अशोक अंबोरे यांचेच हे पैसे असल्याचं या तरुणांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली मात्र गुन्हा दाखल झालेला नाही. भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर भाजपने हा आरोप फेटाळला असून, शिवसेनेची ही स्टंटबाजी असल्याचं भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय.  पालघर : शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं, भाजपवर आरोप 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget