मुंबई : पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या 75 तालुक्यांमधील 4 हजार गावं सहभागी झाले आहेत.

7 एप्रिलला रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी प्रत्येक गावात श्रमदानाला सुरुवात झाली. जो तो आपल्या परीने श्रमदान करत आहे. गाव दुष्काळमुक्त करायचं हा एकच ध्यास घेऊन, गावकरी कामात जुंपले आहेत.

गावातील लहान मुलं, तरुण आणि वृद्ध सर्वजणी एकजुटीने काम करत आहेत.

नुकतंच आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 'पानी फाऊंडेशन'च्या कामांना भेट दिली. जोगेवाडीत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं हाती घेण्यात आली आहेत.

श्रमदान केल्यास फ्री हेअर कट

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनकारंजा या गावात मोठ्या प्रमाणात श्रमदान सुरु आहे. या गावातील अशोक पवार यांनी  श्रमदानासोबत एक मोठं काम केलं आहे.

अशोक पवार हे केशकर्तनकार आहेत. अशोकरावांनी नागरिकांना एक ऑफर दिली आहे.

“जर कोणी आमच्या बनकारंजा या गावात येऊन श्रमदान करेल, त्यांचे 45 दिवस फुकटात केस कापून मिळतील”, अशी ऑफर अशोक पवार यांनी दिली आहे.



दुष्काळाला हद्दपार करण्यासाठी बनकारंजातील गावकऱ्यांची एकजूट झाली आहे. जो तो आपआपल्या परीने काम करत आहे. अशोक पवार स्वत: श्रमदान करत आहेतच, शिवाय त्यांनी अशापद्धतीची ऑफर देऊन, नागरिकांना श्रमदानासाठी प्रोत्साहन दिलं आहे.

संबंधित बातम्या

जलसंधारण कामांच्या पाहणीसाठी आमिर-किरण पाथर्डीत