औरंगाबाद : कॉपी करताना पकडल्याने इमारतीवरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. औरंगाबादमधील एमआयटी कॉलेजमध्ये मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला होता.


औरंगाबादमधील एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सचिन वाघ या विद्यार्थ्याने काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परीक्षेत कॉपी करताना शिक्षकांनी सचिनला पकडलं होतं.

या प्रकारामुळे व्यथित झालेल्या सचिनने निलंबित होण्याच्या भीतीने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. सचिनला तातडीने जवळच्या बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.



फी भरायला पैसे नसल्यामुळे सचिनने इमारतीवरुन उडी मारल्याचं आधी म्हटलं जात होतं. मात्र परीक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे खजिल झाल्याने सचिनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं नंतर समोर आलं.

सचिन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत असतानाचा प्रकार काही विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये कैद केला होता. दुर्दैवाने वेळीच मदत न मिळाल्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले.

कालचा व्हिडिओ :