मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात डिझायनर आणि ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अँड्र्यू मिलिसन यांनी अलीकडेच आमिर खान आणि किरण राव यांच्या पानी फाऊंडेशनवर एक एपिसोड आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे.

पाणलोट व्यवस्थापनावरील काम समजून घेण्यासाठी अँड्र्यू यांनी महाराष्ट्रातील एका गावाला भेट दिली होती. पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्यांनी केलेले काम पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि पृथ्वीवरील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून त्यांनी याचा गौरव केला. त्यांनी त्यावर एक लघुपटही बनवला असून तो आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केला आहे.

पानी फाऊंडेशन पाण्यासाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ निवारण व पाणी व्यवस्थापन या क्षेत्रांत ती काम करते. आमिर खान, किरण राव, रीना दत्ता आणि सत्यजित भटकळ यांनी या संस्थेची स्थापना केली असून पाणी फाऊंडेशनचा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे.

पर्माकल्चर म्हणजे शेतीला टिकाऊपणा आणि स्वावलंबित्व प्रदान करण्यासाठी पर्यावरणीय प्रणालींचा विकास करणे. जीवनातील सद्भावासहित निसर्गाकडे पाहण्याचा हा एक समग्र दृष्टीकोन आहे आणि पारंपरिक तंत्राच्या अवलंबाचे मुख्य उद्दीष्ट आपल्याला स्वयं निर्माता बनवते. जगातील सर्वात मोठा पर्माकल्चर प्रकल्प म्हणून अँड्र्यूने याचे अगदी योग्य मुल्यांकन केले असून आमिरच्या दुष्काळमुक्त आणि टिकाऊ गावांच्या दृष्टीकोनाजवळचे ते एक पाऊल आहे.

पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांना पाणलोट व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे, ज्याद्वारे गावकऱ्यांनी एक संयुक्त आघाडी उघडून संपूर्ण जलाशयात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी स्पिलवेची निर्मिती केली, ज्यामुळे गावचा पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. याचा परिणाम आश्चर्यकारक होता, ज्यामुळे हा प्रकल्प सर्वात फलदायी झाला आहे.