एक्स्प्लोर
लातूरमध्ये अंधश्रद्धेतून घुबडाचा बळी

लातूर: लक्ष्मीचे वाहन असलेल्या घुबडाची दिवाळीमधील लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुजा केल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, अशी धारणा आहे. पण याच अंधश्रद्धेतून लातूरमध्ये एका घुबडाचा बळी गेला आहे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घुबडाची पुजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घुबड पकडण्यात येतात. त्यांनी उडून जाऊ नये, यासाठी त्यांचे पंख कापले जातात किंवा बांधले जातात. लातूरच्या कव्हा रोड परिसरात अशाच एका पंख बांधलेल्या अवस्थेतील घुबड आढळून आले आहे. त्यामुळे पैशाच्या हव्यासासाठी मुक्या जीवांशी खेळणाऱ्या लोकांना शिक्षा व्हावी, अशी मागणी पक्षीप्रेमींमधून करण्यात येते आहे.
Before You Go
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















