एक्स्प्लोर

सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून अडवता येणार नाही!

खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यापासून मज्जाव करण्याचा व्यवस्थापनाला अधिकार नसल्याचं अरुण देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

औरंगाबाद : सिनेमागृहात गेल्यानंतर तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावरच काढून ठेवावे लागतात. मात्र ग्राहकाला हवं ते अन्न सिनेमागृहात नेऊन खाण्याचा अधिकार आहे. सिनेमागृह व्यवस्थापन ग्राहकाला अडवू शकत नाही, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिली. औरंगाबादमध्ये अरुण देशपांडे एबीपी माझाशी बोलत होते. खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेताना केवळ सुरक्षेच्या दृष्टीने त्याची सर्व प्रकारची पडताळणी होणं गरजेचं आहे. मात्र खाद्यपदार्थ सिनेमागृहात नेण्यापासून मज्जाव करण्याचा व्यवस्थापनाला अधिकार नसल्याचं अरुण देशपांडे यांनी स्पष्ट केलं. खाद्यपदार्थ नेताना अडवणूक केल्यास काय कराल? कायदा काहीही सांगत असला तरी सिनेमागृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यापासून मज्जाव केला जातोच. त्यामुळे अशा वेळी काय करायचं, हे एक जबाबदार ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हालाही अशा प्रसंगाचा सामना करावा लागल्यास तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे (डीएसओ) याबाबत रितसर तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर ग्राहकाला पुढील माहिती दिली जाईल. दरम्यान यापुढे राज्यातील सर्व सिनेमागृहांबाहेर याबाबतची नियमावली लावली जाणार असल्याचं अरुण देशपांडे यांनी सांगितलं. याबाबतची नोटीस सर्व सिनेमागृह मालकांना दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे सिनेमागृहातील पदार्थ विकण्यासाठी ग्राहकांची होणारी ही लूट आता तरी थांबेल, अशी अपेक्षा आहे. ''छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास तक्रार करा'' कोणत्याही वस्तूचे छापील किंमतीपेक्षा म्हणजे एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतले जाऊ शकत नाहीत. मात्र पाणी बॉटलसारख्या वस्तूंची सिनेमागृहात वाढीव दराने विक्री केली जाते. त्याबाबतही तक्रार केली जाऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालायात ही तक्रार करता येते. ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहनही अरुण देशपांडे यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
Embed widget