उस्मानाबाद: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. या निमित्तानं एबीपी माझा तुम्हाला एक अशी कहाणी दाखवणार आहे, जी पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. 1988 मध्ये औरंगाबादला झालेल्या दंगलीत एक व्यापारी सापडला. त्याला या दंगलीचा जबर धक्का बसला. त्यानंतर गेली 30 वर्षे तो व्यापारी झोपला नाही.  स्वत:च्या घरी एकही दिवस मुक्कामी राहिलेला नाही. संध्याकाळी सहा वाजले की पैसे घेणे, पिशवी भरणे, आणि प्रवासाला निघणे असा दिनक्रम सुरु असतो.  त्याच्या या आजरपणामुळे कुटुंब कंगाल झालं आहे. मानसिक आजार हा आजही जाहीर चर्चेचा विषय नाही. त्यामुळं भले भले आपला आजार लपवून ठेवतात.


संध्याकाळ झाली की 76 वर्षाच्या शेख अलिम शेख अहमद यांची घराबाहेर पडण्याची वेळ होते. 30 वर्षे झाली.. शेख साहेबांचा हा नित्यक्रम आहे. रात्र झाली की ते घरी थांबत नाहीत. नातवंडांनी दरवाजाला कुलूप लावलं, तरी ते काढून अलिम शेख बाहेर जातातच.

एवढ्या वर्षात घरात काही लग्न सोहळे..वाढदिवस...मयत झाली...पण शेख साहेब कधीच घरी थांबले नाहीत. घरातून बाहेर पडून ते बसस्थानक गाठतात.  बसस्थानकांवर उभी असलेली,  दिसेल ती गाडी पकडून शेख साहेब निघतात. कधी अहमदनगर, कधी लातूर..बीड..औरंगाबाद, नांदेड..पुणे...कधी कधी मुंबई सुद्धा.



30 वर्षात कित्येक गावं, शहरं शेख साहेबांनी पालथी घतली आहेत. प्रवासावर जवळपास 27 लाखांहून अधिक खर्च झाला असावा.  बस जिथे थांबेल तिथल्या बस स्थानकावर उतरायचं.जवळ रेल्वे स्थानक आसेल तर तिकडे निघायचं.

एबीपी माझाच्या टीमनेही शेख अलिम शेख यांचा दिनक्रम जाणून घेत त्यांच्यासोबत प्रवास केला. त्यांचा आजचा मुक्काम सोलापूर रेल्वे स्टेशनवर होता. या रेल्वे स्टेशनच्या परिसरातले लोक.... रेल्वे स्टेश्नवरचे रिक्षावाले,प्रवासी...स्टॉलवाले.. सर्वजण शेख साहेबांना ओळखतात.



ज्यांना हवी त्यांना पिशवीतून चप्पल काढून विकून टाकायची, आलेल्या पैश्यातून उद्याच्या प्रवास करायचा, हे शेख साहेबांचं काम.

रेल्वे स्टेशनवर रात्री 12 वाजता जेवण, जेवणानंतर पुन्हा गाढ..गूढ विचार.  पहाटे चार वाजता...थोडं आडवं पडयाचं... पुन्हा सहा वाजता उठून..परतीचा प्रवास सुरु.



गेली 30 वर्षे न झोपलेले शेख अलीम वयाच्या 40 पर्यंत सामान्य जीवन जगत होते. 1988 साली औरंगाबादला झालेल्या दंगलीनं या माणसाचं आयुष्य बदलून गेलं.

दंगलीच्या दिवसापासून शेख साहेब एकही दिवस घरी झोपलेले नाहीत. या आजारपणानं..मुलांच्या शिक्षणावर परिमाण झाला. कुटुंबाच्या मालकीची दोन मोठी चप्पल विक्रीची दुकानं,राहतं घर हातातून गेलं. घरचा कर्ता माणूस असा झाल्याने घरच्यांचीही झोप उडाली.

अंगात ताकद होती..तोवर ठिक होतं..पण आता या नातवांना आपल्या या आजोबाच्या आनोख्या आजारात काही बरं वाईट झालं तर काय होईल याची चिंता सतावत राहते.

मुलांनाही कळलेलं नाही.पित्याच्या आजारांवर नेमका उपाय काय करावा.

डॉक्टरांच्या मते..शेख यांना मानसिक आजार आहे..एंग्झायटी आहे..कुटुंबानं केलेल्या मर्यादीत उपचारावर शेख यांची 30 वर्षे गेली.. पुढची काही वर्षे जातील.

या आजारावर वेळेवर नेमका उपचार झाला असता तर शेख साहेबांचंही आयुष्य सामान्य माणसांसारखाचं गेलं असतं.रोजच्या या जगावेगळ्या जगण्यातून त्यांची सुटका झाली असती.

VIDEO: