उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये एका महिलेची गळ्यात चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चहाड्या सांगितल्याच्या रागातून आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती आहे.
शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबादच्या अलूर गावात ही घटना घडली. या महिलेनं चहाड्या सांगितल्या आणि घरातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा राग मनात धरुन आरोपींनी तिची धिंड काढली.
सुदैवाने सरपंचांनी मध्यस्थी करुन महिलेची सुटका केली. या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याची तक्रार मुरुम पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
संबंधित 55 वर्षीय महिलेला उमरग्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे