Maharashtra Budget 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Finance Minister Devendra Fadnavis) 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शेतीसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी तीन वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.  


एक हजार जैव निवीष्ठा केंद्र उभारण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी  3 वर्षांत 1000 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.  शेतीच्या विकासासाठी सर्वसमावेशकता आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले. 


सेंद्रीय शेती म्हणजे काय?



सेंद्रीय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. ही शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रीय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरला जात होता. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरले जातात.

 

राज्यात 'नमो शेतकरी सन्मान निधी' योजना


देवेंद्र फडणवीसांनी शेतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये महत्वाची घोषणा म्हणजे केंद्र सरकारच्या पंतप्रधान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi)  योजनेच्या धर्तीवर राज्यात 'नमो शेतकरी सन्मान निधी' (NAMO Shetkari Maha Sanman Nidhi Maharashtra) योजनेची घोषणा करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या सहा हजार रुपयांसह महाराष्ट्राचे सहा हजार जमा होतील. म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12 हजार रुपये जमा होणार आहेत. 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा' लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी 2023-24 मध्ये  सहा हजार 900 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. 


मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार


- मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार होणार आहे.
- आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन
- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र
- या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार




महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget : देवेंद्र फडणवीसांचा घोषणांचा पाऊस, कृषी क्षेत्रासाठी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा