एक्स्प्लोर

सरकार म्हणजे डोरेमॉन, जनता म्हणजे नोबिता : विखे पाटील

नागपूर : सरकार म्हणजे डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिताचं कार्टून झालं आहे, अशी टीका  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. दोन वर्ष उलटूनही सरकारमध्ये कार्यतत्परता नसल्याचंही विखे पाटील म्हणाले. सरकार म्हणजे डोरेमॉन-नोबिताचं कार्टून झालं आहे. ज्याप्रमाणे डोरेमॉन नोबिताला वास्तवापासून दूर नेतं आणि स्वप्न दाखवतं त्याप्रमाणे हे सरकार करत असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केला. सरकारला सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीवही नाही, समजही नाही. फक्त वरकरणी घोषणा करायच्या आणि मग यू टर्न घेऊन जनतेची दिशाभूल करायची, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आपलं सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. 'आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो आणि सरकार क्लीन चिट देतं. काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे आणि नोटाबंदी लागू केली. काळा पैशासंदर्भात नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा कुठलाही विचार न करता घेतला आहे. तयारीशिवाय घेतलेला नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या मुळाशी येत असल्याचंही विखे पाटील म्हणाले. शेतकरी आत्महत्येसाठी आमच्या (आघाडी) सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करणाऱ्याची मागणी केली जायची, मात्र आज अनेक जणांचा एटीएम आणि बँकांच्या रांगेत मृत्यू होत आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केला. माझ्या जिल्ह्यात 90 टक्के शेतकऱ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहेत. जिल्हा बँकांना वेठीस धरलं जात आहे. मात्र डीमार्ट, पेटीएम सारख्यांना खुला बाजार सुरु केला आहे. सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचं काम सुरु असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. लतादीदींचं 'गैरो पे रहम, अपनो पे सितम..!!' हे गाणंही या सरकारला लागू होत असल्याचा टोला त्यांनी हाणला. मुख्यमंत्री जरी ओव्हरटाईम मंत्री आहे असं म्हणत असतील तरी नागपूरमध्ये सर्व गुन्हेगार फुलटाईम कामाला लागले आहेत, अशी टीकाही विखे पाटलांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Gadchiroli News : गडचिरोलीकरांसाठी गुड न्यूज! आरमोरीवरून गोंदिया आणि चांदा फोर्टशी थेट कनेक्टिव्हिटी; रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय
गडचिरोलीकरांसाठी गुड न्यूज! आरमोरीवरून गोंदिया आणि चांदा फोर्टशी थेट कनेक्टिव्हिटी; रेल्वे बोर्डाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Embed widget