एक्स्प्लोर

असंही एक गाव, जिथं दिवाळी साजरी केली जात नाही!

पन्हाळा तालुक्यातील कोलोली हे गाव कोल्हापूर पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर कासारी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. या गावातील नागरिक सध्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत, कारण ते ही दिवाळी साजरी करत नाहीत.

कोल्हापूर : संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण उत्साहाने साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोलोली या गावात दिवाळी मात्र साजरी केली जात नाही.  संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करत असतो त्यावेळी या गावातील मंडळी मात्र शांत बसून इथून पुढे एक महिन्यानंतर येणाऱ्या दिवाळीची वाट पाहत असतात. दिवाळीची अमावस्या सोडून 30 दिवसानंतर येणाऱ्या अमावस्येला कोलोली गावात देव दिवाळी साजरी केली जाते. यावेळी दिवाळीप्रमाणेच गावकरी नवीन कपडे, घरांसमोर आकाश कंदील लावून मोठ्या उत्साहात या गावात दिवाळी साजरी केली जाते. पन्हाळा तालुक्यातील हे आहे कोलोली हे गाव कोल्हापूर पासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर कासारी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात दिवाळी साजरी होत आहे , मात्र गावात दिवाळी निमित्त नवीन कपडे , आकाश कंदील , फराळ मात्र नाही आहे. दररोज आपण ज्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो त्याच पद्धतीने या गावातील नागरिक सध्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत,  कारण ते ही दिवाळी साजरी करत नाहीत. कोलोली गावाची ग्रामदेवता गाडाई देवी आहे. गाडाई देवीचे एक पुरातन मंदिर गावाच्या मध्यभागी आहे.  हे मंदिर जागृत असल्यामुळे भाविक देवीला एखादा नवस बोलले तर देवीच्या समोरील कासवा जवळ चमड्याचे एक जोड चप्पल ठेवतात. जे भक्त या देवीला नमस्कार करण्यासाठी मंदिरात येतात ते या चमड्याचे चप्पल आपल्या गालावर आणि माथ्यावर मारून घेऊन देवीला नमस्कार करतात, अशी पद्धत या गावात आहे. या देवीची यात्रा म्हणजेच या गावात 'देव दीपावली' म्हणून साजरी केली जाते. गोडधोड फराळ , नवीन कपडे घरांसमोर आकाश कंदील हे करत असताना या गावाला याच दिवशी यात्रेचे स्वरूप प्राप्त होतं आणि इथूनच पंचक्रोशीमध्ये यात्रा सुरू होतात. या गावात दिवाळी का साजरी करत नाहीत आणि देवी चे महत्व काय आहे यासंदर्भात ही दोन अख्यायिका आहेत. या गावात एखादी मुलगी लग्न करून आली की तिला सुरुवातीला माहेरी दिवाळीसाठी,  भाऊबीजेसाठी माहेरी नेलं जातं. मात्र तिच्या माहेरी जेव्हा दिवाळी साजरी केली जाते, त्यावेळी सासरी मात्र दिवाळी होत नाही. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना ही प्रथा थोडी विचित्र वाटते. यावेळी आपल्या माहेरची ओढ त्यांना लागलेली असते पण गावची परंपरा असल्याने त्या काही करू शकत नाहीत. दिवाळी संपल्यानंतर कोलोली गावची दिवाळी मात्र त्याच उत्साहाने करतात. प्रत्येक गावाची आपलीशी एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते . संपूर्ण भारत वर्षांमध्ये या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. दिवाळी असूनही दिवाळी न साजरी करणाऱ्या या गावाने आज ही आपले वेगळेपण टिकून ठेवले आहे. आज आपण कितीही शिकलो , सवरलो असलो तरीही गावाकडील ग्रामस्थ मात्र पूर्वापार चालत आलेल्या परंपरा मोठ्या उत्साहानं आणि आवडीनं जोपासत आहेत. त्यामुळेच या परंपरा आजही आपलं वेगळं स्थान टिकवून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Embed widget