एक्स्प्लोर
आमदार रमेश लटके यांच्या खाजगी सहाय्यकाचा मृत्यू
मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या नावावर असलेल्या रुममध्ये ते मृतावस्थेत सापडले. दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील 46 क्रमांकाच्या रुममध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला.

नागपूर : आमदार रमेश लटके यांच्या खाजगी सहाय्यकाचा मृत्यू झाल्याची घटना नागपुरातील आमदार निवासात घडली. विनोद अग्रवाल (वय 50 वर्षे) असं त्यांचं नाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या नावावर असलेल्या रुममध्ये ते मृतावस्थेत सापडले. दुसऱ्या क्रमांकाच्या विंगमधील 46 क्रमांकाच्या रुममध्ये विनोद अग्रवाल यांचा मृतदेह आढळला. सकाळी बराच वेळ दार वाजवूनही विनोद अग्रवाल यांनी रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यानंतर लॉक तोडून आत प्रवेश केल्यानंतर ही घटना लक्षात आली. विनोद अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशन यंदा पहिल्यांदाच नागपुरात होत आहे. सर्व आमदार उद्यापासून सुरु होणाऱ्या या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. 4 जुलै ते 20 जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















