On This Day In History : सहा नोव्हेंबर हा दिवस इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आज म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. याचा थोडक्यात आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकामध्ये अटक करण्यात आली होती. 2012 मध्ये बराक ओबामा दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्याशिवाय मुंबई राज्यात 'मुंबई वीज मंडळ' स्थापना आजच्याच दिवशी झाली होती. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.  


दक्षिण आफ्रिकामध्ये महात्मा गांधींना अटक -
महात्मा गांधी यांनी सहा नोव्हेंबर 1913 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद धोरणांविरूद्ध आंदोलनं केले होते. ‘द ग्रेट मार्च’ याचे नेतृत्व महत्मा गांधी यांनी केले होते. येथील भारतीय खाण कामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी 1913 मध्ये महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली होती. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत तब्बल 21 वर्षे राहिले होते. गांधीजींच्या सत्याग्रह या विचारांची सुरुवातही दक्षिण आफ्रिकेतून झाली.


अब्राहन लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष -
अब्राहम लिंकन आजच्याच दिवशी 1860 मध्ये अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलेय. अब्राहम लिंकन यांचे विचार आजच्या आधुनिक युगातही लागू होतात. 


'मुंबई वीज मंडळ' स्थापन -
मुंबई राज्यात 'मुंबई वीज मंडळ' 6 नोव्हेंबर 1954 रोजी स्थापन करण्यात आले. या मंडळांवर वीजनिर्मिती, पुरवठा व वितरण यांची जबाबदारी होती. भारतामध्ये 1932 पर्यंत वीज पुरवठा म्हैसूर संस्थान वगळता खाजगी उत्पादकांकडून होत होती. 1933 मध्ये मद्रास व पंजाब प्रांत शासनांनी प्रत्येकी एक वीज उत्पादन केंद्र उभारले. त्यानंतर इतर प्रांत शासनांनी त्यांचे अनुकरण केले. ही केंद्रे शासने खात्यांद्वारा चालवीत व खाजगी उत्पादकांना परवाने घेऊन वीज केंद्रे उभारत होती. वीजेचे दर शासननियंत्रित होते. आजही वीजचे दर शासननियंत्रितच आहेत. 


ओबामा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष -
बराक ओबामा 6 नोव्हेंबर 2012 रोजी अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2008 पासून 2012 पर्यंत त्यांनी पहिल्या टर्ममध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते.  


सचिनला भारतरत्न -
दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वैज्ञानिक प्रो.सीएनआर राव यांना 2013 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ म्हणून घोषित करण्यात आले. दोघांनी आपल्या क्षेत्रात सर्वोच्च कार्य केले होते. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. 


1888 - महात्मा गांधी यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनमध्ये प्रवेश घेतला. 
1814- सेक्सोफोन वाद्याचे जनक अॅडोल्प सॅक्स यांचा जन्म
1861 - बास्कोटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म
1880 - निसान कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म
1912 - भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
1926 - कथाकार, पत्रकार आणि कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये यांचा मुंबईमध्ये जन्म झाला.
1943 -जपानने दुसर्‍या महायुद्धामध्ये अंदमान आणि निकोबार बेट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सुपूर्द केले. 
1968 - याहूचे संस्थापक यारी यांग यांचा जन्म
1996 - अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2001- डीआरडीओचे महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.