एक्स्प्लोर

टेन्शन वाढलं! राज्यात आज 85 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 53 रुग्ण

Omicron Variant In Maharashtra : राज्यात बुधवारी 85 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहचली आहे. 

Omicron Variant In Maharashtra : जगाचं टेन्शन वाढवलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी 85 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. बुधवारी मुंबईत ओमायक्रॉनच्या 53 रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 252 वर पोहचली आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आढळलेल्या 85 रुग्णापैकी 47 जणांचा रिपोर्ट एनआयव्ही आणि 38 जणांचा रिपोर्ट आयआयएसईआर या संस्थेने दिला आहे. एनआयव्हीने दिलेल्या रिपोर्ट्समधील 47 रुग्णापैकी 43 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. तर चार रुग्ण संपर्कातील आहेत. यामध्ये मुंबईतील 34 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन-तीन रुग्णांची नोंद आहे. नवी मुंबई आणि पुणे शहरात प्रत्येकी दोन - दोन रुग्ण आढळले आहेत. तर पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.  तर आयआयएसईआरने दिलेल्या रिपोर्ट्समधील 38 रुग्णापैकी 19 रुग्ण मुंबईतील आहेत. तर कल्याण डोंबिवलीमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे. तर वसई विरार आणि पुणे शहरातील प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे ग्रामीण, भिवंडी, पनवेल आणि ठाण्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. 

राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 252 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 137 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 252 रुग्णांपैकी 99 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. 

राज्यात कुठे किती ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत?
मुंबई - 137 रुग्ण
पिंपरी चिंचवड - 25 रुग्ण
पुणे ग्रामीण - 18 रुग्ण
पुणे शहर - 11 रुग्ण 
ठाणे - 8 रुग्ण
नवी मुंबई - 7 रुग्ण
पनवेल - 7 रुग्ण
कल्याण डोंबिवली - 7 रुग्ण
नागपूर - 6 रुग्ण
सातारा -  5 रुग्ण
उस्मानाबाद -  5 रुग्ण
वसई विरार - 3 रुग्ण
औरंगाबाद - 2 रुग्ण
नांदेड - 2 रुग्ण
बुलढाणा - 2 रुग्ण
भिवंडी - 2 रुग्ण
लातूर - 1 रुग्ण
अहमदनगर - 1 रुग्ण
अकोला - 1 रुग्ण
मीरा भाईंदर- 1 रुग्ण
कोल्हापूर - 1 रुग्ण

राज्यात आढळलेल्या 252 रुग्णांमध्ये 26 रुग्ण इतर राज्यातील आहेत, जे विदेशातून महाराष्ट्रात आले होते. 9 रुग्ण हे विदेशी  नागरिक आहेत. राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ८७९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १७६ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget