ठाणे : शहापूर तालुक्यातील रास, दोर्याचा पाडा या दुर्गम आदिवासी भागातील 14 शेतकऱ्यांनी कर्ज काढून सुमारे 50 एकर जागेत भेंडीची लागवड केली होती. अधीच खर्च करुन कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना लॉकडाउन व संचारबंदीच्या परिस्थितीत भेंडी विक्रीसाठी योग्य बाजारच उपलब्ध नाही. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी भेंडीच्या उभ्या पिकात जनावरे घालत आपला संताप व्यक्त केला.


शहापूर तालुक्यातील 100 टक्के आदिवासी गाव असणाऱ्या रास व दोर्याचा पाडा येथील एक अपंग शेतकरी इतर 14 आदिवासी शेतकऱ्यांना एकत्र करत शासनाच्या गटशेती योजनेद्वारे आदिवासी लोकांचे सबळीकरण करण्यासाठी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेऊन प्रथम शेत तलाव तयार केला. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करून सुमारे 50 एकर जागेत भेंडीची लागवड केली. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बियाणे देऊन उद्घाटन करण्यात आलं. या शेतकऱ्यांच्या पहिल्याच प्रयत्नात पिकही चांगले आले. तसेच यांचं अनुकरण करत गावातील इतर शेतकऱ्यांनी देखील भेंडीचीची लागवड केली. पीक चांगले येऊन देखील हातातोडांशी आलेला घास कोरोना विषाणूंमुळे शेताच्या बांधावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.


सरकारने शेतकरी, मजूर, गरिबांच्या खात्यात 7500 रुपये आर्थिक मदत जमा करावी : सोनिया गांधी


उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ
लॉकडाउनमुळे राज्यातील बाजारपेठा व दळणवळणाची साधने बंद झाली. उत्पादन केलेल्या भेंडीला मागणी व योग्य बाजारभाव नसल्याने भेंडीचं करायच काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे? काहींनी कवडीमोल बाजारभावात दिल्याने शेतीस लागणारे खत, औषधं, फवारणी, मजुरीचा खर्चही त्यातून निघत नाही. परिणामी पर्यायाने शेतकऱ्यांना शेतात जनावरे घालावी लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतीच्या लागवडीसाठी राजेश गडगे यांनी आपलं घर व शेती बँकेत गहान ठेवून 20 लाखांचं कर्ज काढलं होतं. मात्र, हे कर्ज आत्ता कसं फेडायचं याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.


यामध्ये एक आदिवासी कुटुंब हे अंपग असुन या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी भेडींची लागवड केली होती. त्या उभ्या पिकांत जनावरे घालण्याची वेळ आल्याने आता पुढे हप्ते कसे फेडायचे हा प्रश्न समोर उभा राहिला आहे.


Lockdown 4.0 | कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना बांधावर बियाणं पोहोचवणार; खरीप हंगामाच्या बैठकीत निर्णय