Solapur Accident News : सोलापूरजवळ बुधवारी सकाळी एका गोडेतेलाच्या टँकरचा अपघात झाला. अपघातानंतर टँकर पटली झाला अन् गोडेतेल रस्त्यावर वाहू लागलं. अपघातग्रस्त ठिकाणापासून जवळच्या गावात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. मग काय, नागरिकांनी रस्त्याकडे धाव घेतली. गोडेतेल पळवण्यासाठी घागर आणि कळशी घेऊन लोकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त ठिकाणी तेलासाठी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. महागाईच्या झळीने होरपळलेल्या नागरिकांनी घागर, कळशी अन् मिळेल त्या भांड्यामध्ये गोडेतेल लंपास केलं. गोडतेल घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. 


सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी गावानजीक गोडेतेलाच्या टँकरचा बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अपघात झालाय. टँकरचा टायर फुटल्याने टँकर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला अन् ही दुर्घटना घडली. टँकर पलटी होताच टँकरमधून गोडे तेलाच्या धारा लागल्या. गोडेतेल घेऊन जाण्यासाठी घागरी, डबे आणि मिळेल ते साहित्य घेऊन लोकांनी अक्षरशः रांगा लावल्या होत्या. मात्र पोलीस प्रशासनाने येऊन लोकांना पांगावले. महागाईच्या जमान्यात लोकांनी भरभरून तेल नेहले. मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटवरून हा टँकर बंगळुरुच्या दिशेने चालला होता. त्याचवेळी टायर फुटल्याने हा अपघात झालाय.


दरम्यान या टँकरच्या अपघातानंतर उसाच्या ट्रॅक्टरचाही अपघात याच ठिकाणी झाला. ट्रॅकटरच्या ट्रॉलीचा सेंटर बोल्ट तुटल्याने हा अपघात झाला. अपघातामुळे संपूर्ण रस्त्यावर ऊस पडले होते. सुदैवाने दोन्ही अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली असून अपघातग्रस्त वाहनांना दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 



संबधित बातम्या :
Aurangabad Beer truck Accident : बियरच्या कंटेनरला अपघात, बियरच्या बाटला पळवण्यासाठी लोकांची झुंबड 
Buldhana Accident : जळगावात खाद्यतेल नेणाऱ्या टँकरला अपघात, तेल पळवण्यासाठी नागरिकांची गर्दी
नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात, डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड