OBC Reservation LIVE UPDATE : केंद्राकडून इम्पॅरिकल डेटा देण्यास नकार, राजकीय प्रतिक्रिया उमटल्या, पाहा लाईव्ह अपडेट

OBC Reservation संदर्भात इम्पॅरिकल  डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नाही

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2021 12:51 PM

पार्श्वभूमी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पॅरिकल  डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नाही.  प्रशासकीय कारणं आणि त्रुटींचा हवाला...More

मोदी सरकारचे ओबीसी प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट झालं-प्रा हरी नरके

आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण, केंद्राकडील इंपिरिकल डेटा यावर सुनावणी झाली.केंद्र सरकार डेटा का देत नाही, मोदी सरकारचे ओबीसी प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट झालं आहे, अशी प्रतिक्रिया अभ्यासक प्रा हरी नरके यांनी दिली आहे.