एक्स्प्लोर

Nurses Protest | विविध मागण्यांसाठी नर्सेस आक्रमक, राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन

परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र आजवर कुठलीही दखल न घेतल्याने परिचारिकांनी आंदोलन केलंय.शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबई : रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये. रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी.  कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी यासह अन्य काही महत्वाच्या मागण्यांसाठी राज्यभरात आज परिचारिकांनी आंदोलन केलं. शासनाकडे परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापपावेतो कुठलीही दखल घेण्यात न आल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन मार्फत आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिकमध्ये नर्सेसनी हे आंदोलन केलं. नाशिकमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर परिचारांकांकडून आज सकाळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येत निषेध नोंदवण्यात आला. परिचारिकांनी मोठ्या संख्येने यात आपला सहभाग नोंदवला होता. काय आहेत परिचारिकांच्या मागण्या
  • महाराष्ट्रातील परिचारिकांची वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग मिळून रिक्त असलेली 6 हजार पदे तातडीने भरावी तसेच कंत्राटीकरण करण्यात येऊ नये.
  • परिचारिकांना रोटेशननुसार 7 दिवस कोविड ड्युटी व त्यानंतर 7 दिवस अलगीकरण रजा देण्यात यावी, कोविड ड्युटी 4 तासांच्या शिफ्टमध्ये असावी.
  • कोविड बाधित व संशयित रुग्णाच्या सेवेत कार्यरत परिचारिकांना दर्जेदार PPE किट, N-95 मास्क, इतर साहित्य त्वरित मिळावे.
  • कोविड ड्युटी नंतर परिचारिकांची स्वॅब टेस्ट करण्यात यावी.
  • हृद्यरोग, मधुमेह, श्वसनसंस्थेचे आजार व इतर गंभीर आजार असलेल्या परिचारिकांना कोविड ड्युटीमध्ये सूट मिळावी.
  • कोविड रुग्णास सेवा देतांना मृत्यू आल्यास शासनाने घोषित केलेली 50लाख रुपये विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसेच वारसास शासकीय सेवेत नोकरी द्यावी.
  • परिचारिका बाधित झाल्यास त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव जागा असाव्यात.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत कोविड रुग्णास सेवा देणाऱ्या परिचारिकांना 300 रुपये दैनंदिन भत्ता देण्यात येतो त्याप्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात यावा.
  • कोविड सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने विनाविलंब समिती गठित करावी.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Sanjay Gaikwad : मतचोरीवर बोलणारा मी एकटा सत्ताधारी पक्षाचा नेता, माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले....
मतचोरीवर बोलणारा मी एकटा सत्ताधारी पक्षाचा नेता, माझ्या मतदारसंघात 50 हजार बोगस मतदार; आमदार संजय गायकवाडांचं मोठं विधान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत म्हणाले....
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा

Embed widget