एक्स्प्लोर
लोकसभेची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार : रावसाहेब दानवे
आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समविचारी पक्षांनी युतीसाठी एकत्र यावे असे आवाहन दानवे यांनी शिवसेनेला केले आहे. आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

धुळे : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात सांगितले आहे. दानवे यांनी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर आल्याने आपापली कामे करून घ्या, नंतर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हा नगरसेवकांना प्रयत्न करायचे आहेत असेही सांगितले.
शिवसेनेच्या अयोध्या मुद्याला भाजपचा पाठिंबा असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रावसाहेब दानवे धुळ्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत धुळे महानगर पालिका निवडणुकीत भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बंडखोरीबाबत पक्ष काय कारवाई करणार का? या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे यांनी कारवाई करणार नसल्याचे सांगितले.
आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. समविचारी पक्षांनी युतीसाठी एकत्र यावे असे आवाहन दानवे यांनी शिवसेनेला केले आहे. आगामी निवडणुका भाजप विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ . सुभाष भामरे, रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज