मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरता असताना राज्य सरकारने आता ब्रेक दि चेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रियी सुरु केली आहे. मात्र, आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी असल्याचे सांगण्यात येतंय. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. 

  
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नसल्याने वेगवेगळ्या 5 पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येणार आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत. 


पालिका व जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय घटक 


वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. 



अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई –विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाणार आहे.


ब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळं प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)


क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.


BMC Unlock Guideline : मुंबई महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी, लोकल सर्वसामान्यासाठी बंदच


निर्बंधांचे स्तर


स्तर 1- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.


स्तर 2 - ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी 25 ते 40 च्या दरम्यान असेल.


स्तर 3- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल.


स्तर 4- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर 10 ते 20 टक्के दरम्यान असेल आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.


स्तर 5-  जेथे 20 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.



  • स्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे दुकानं संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा देणारे तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.

  • ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल. आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.

  • एखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार नाहीत.

  • सरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोविड व्यवस्थापनासाठी 100 टक्के उपस्थितीसह काम केले जाऊ शकते. मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.