नागझिरा अभयारण्य हे मध्य भारतामधील ताडोबानंतरचं वाघांचं सर्वात मोठं जन्मस्थान मानलं जातं. मात्र या अभयारण्यात एकही वाघ दिसत नसल्याच्या बातमीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नागझिरा अभयारण्याच्या वनाधिकाऱ्यांना जेव्हा वाघाच्या गायब होण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्याकडेही या प्रश्नावर समाधानकार उत्तरं नव्हती.
आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता, 'जय'च्या शोधासाठी 100 स्वयंसेवक
दुसरीकडे आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ जय तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. जयला शोधण्यासाठी मोठी मोहिम राबवण्यात आली आहे. 100 हून अधिक स्वयंसेवक जयचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्याचा काहीच पत्ता नाही.