नवी मुंबई : नवी मुंबईत 15 वर्षीय स्वप्नील सोनावणेच्या हत्ये प्रकरणी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित तरुणीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये हत्या झाल्याचं काल उघड झालं होतं.


 

नेरुळ पोलिसांनी तरुणीची आई, वडील राजेंद्र नाईक (वडील, वय 50 वर्ष), सागर नाईक (भाऊ, वय 25 वर्ष), साजेश नाईक (भाऊ, वय 22 वर्ष), दुर्गेश पाटील (मित्र, वय 22 वर्ष), आशिष ठाकूर (मित्र, वय 23 वर्ष) आणि एक रिक्षावाला अशा सात आरोपींना अटक केली आहे.
तपासात हलगर्जी केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.

 

 

नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या


 
या प्रकरणातील मृत अल्पवयीन तरुण आणि ताब्यात घेतलेली तरुणी पहिलीपासून एकाच वर्गात शिकत होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली.

 

यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.