एक्स्प्लोर

राज्यात यंदा भारनियमन नाही, वीज नियोजनामुळे संकट टळलं

महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीन व नवीकरणीय स्त्रोत यांच्यासोबत विविध दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत

मुंबई : महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात यंदा कुठेही भारनियमन होणार नाही. दीर्घकालीन वीज करार आणि नवीन तसंच नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. सद्यस्थितीत महावितरणची उच्चतम विजेची मागणी ही 19,000 ते 19,500 मेगावॅट इतकी आहे. ती दीर्घकालीन करारांतर्गत औष्णिक वीज प्रकल्पातून आणि नवीन तसंच नवीकरणीय स्त्रोतांमधून पूर्ण करण्यात येत आहे. महावितरणकडे झीरो शेड्यूलमध्ये असलेले परळी औष्णिक प्रकल्पामधील संच क्र. 6, 7 आणि एनटीपीसी सोलापूर या औष्णिक प्रकल्पामध्ये असलेला वाटा मिळून एकूण 1,144 मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज उपलब्ध आहे. पॉवर एक्सचेंजवर वीज उपलब्ध असल्यामुळे आणि विजेच्या मागणीएवढी उपलब्धता असल्याकारणाने जरी कोयना वीजनिर्मिती केंद्रामधील टप्पा क्र. 4 मधून वीज निर्मिती पूर्णपणे बंद झाली तरीही राज्यात कुठेही भारनियमना सारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. कोयना धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्याने आणि किमान 15 जुलैपर्यंत हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत कोयना जलविद्युत प्रकल्पामधून वीज निर्मिती बंद ठेवण्याच्या सूचना सातारा सिंचन मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने (महानिर्मिती) 29 मे रोजी संध्याकाळपासून कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा क्रमांक 4 मधून वीज निर्मिती बंद केली आहे. चिपळूण तालुक्यास पाणीपुरवठा नियमित चालू ठेवण्यासाठी टप्पा क्र. 1 व 2 मधून कमी दाबाने (40 मेगावॅटची) वीज निर्मिती करण्यात येत आहे. महावितरण कंपनीने महाजनको, एनटीपीसी, एनपीसीआयएल, स्वतंत्र वीज प्रकल्प व नवीन व नवीकरणीय स्त्रोत यांच्यासोबत विविध दीर्घकालीन वीज खरेदी करार केलेले आहेत. या वीजनिर्मिती स्त्रोंताकडून उपलब्ध होणारी वीज व विजेची मागणी लक्षात घेऊन, महावितरण कंपनी विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये ताळमेळ घालत असते. राज्यात विजेची मागणी वाढल्यास किंवा काही कारणास्तव चालू असलेल्या प्रकल्पांमधून वीज निर्मिती कमी झाल्यास महावितरण कंपनीतर्फे झीरो शेड्यूलमध्ये असलेले संच किंवा पॉवर एक्सचेंजवर वीज खरेदी करुन विजेच्या उपलब्धतेत वाढ करण्यात येईल व याप्रमाणे मागणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्यात कुठेही वीजेच्या उपलब्धतेमुळे भारनियमन होण्याची शक्यता नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर

Embed widget