एक्स्प्लोर

नो हेल्मेट, नो पेट्रोल, रावतेंचा जालीम उपाय !

मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही.   परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे 1 ऑगस्टपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' हे फलक तुम्हाला ठिकठिकाणी दिसू शकतील. त्यामुळं विना हेल्मेट गाडी चालवणं महागात पडणार आहे.   ज्या मोटारसायकलस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट नसेल त्याला पेट्रोल मिळणार नाही. शिवाय विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत.   यापूर्वी  केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही ही मोहीम राबविण्यात येत आहे.   मुंबई: विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दणका दिला आहे. कारण लवकरच हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोलच मिळणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनं 2500 पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत.   त्यामुळं पुणे असो की मुंबई किंवा मग नागपूर, औरंगाबाद, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांना नवी हेल्मेट खरेदी करावी लागणार आहेत.   *राज्यभरात 18 राष्ट्रीय आणि 291 राज्य असे 33 हजार 700 किलोमीटरचे महामार्ग आहेत. *महाराष्ट्रात 2013 मध्ये 61 हजार 890 अपघात झाले, ज्यात 12 हजार लोकांचा मृत्यू झाला. *22 हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले, तर 18 हजार लोकांना किरकोळ दुखापती झाल्या. *सरासरीचा विचार करता महाराष्ट्रात रस्ते अपघातात दिवसाला 4 लोकांचा जीव जातो *देशात एका दिवसात अपघातामध्ये 400 ते 500 लोक मृत्युमुखी पडतात *म्हणजे देशात प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला रस्ते अपघातात एकाचा मृत्यू होतो   हे सगळे अपघात हेल्मेट न घातल्यानं होतात असं नाही. अतिवेग, मद्यपान करुन गाडी चालवणं, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि वजन कोंबण्यामुळंही अपघात होतात.   मात्र शहरांमध्ये होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा जीव जाण्याचं प्रमाण अधिक आहे. ज्याला बहुतेक वेळी हेल्मेटचा वापर न करणं कारणीभूत ठरतं. त्यामुळं नव्या नियमांचा बाऊ करणं फारसं शहाणपणाचं नाही.   मुंबई, नागपुरात विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर हुक्की आली की पोलीस कारवाई करतात. दोन-चार दिवस लोकही डोक्यावर हेल्मेट वागवतात. नंतर पहिले पाढे पंचावन्न.. पुणेकर तर पाकिस्तानी आक्रमण झाल्याच्या जोशात रस्त्यावर उतरतात. हेल्मेट न घालणं हा जन्मसिद्ध हक्क असल्याच्या अविर्भावात आंदोलन करतात. त्यामुळं पोलीस, राजकारणी हतबल होतात.   आता हेल्मेट घालण्यासाठी आणखी एक नवा फंडा रावतेंनी शोधला. त्याची एक्स्पायरी डेट काय आहे हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे. यापूर्वी  केरळमध्येही ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची घोषणा करण्यात आली आहे. या दुचाकी चालकांकडे हेल्मेट नसेल त्यांना एक ऑगस्टपासून पेट्रोल दिलं जाणार नाही, अशी घोषणा केरळ सरकारनं केली आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ही मोहीम राबविण्यात येत आहे.   संबंधित बातम्या

केरळ: 'हेल्मेट नाही तर पेट्रोल मिळणार नाही', 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची नवी नियमावली

हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget