एक्स्प्लोर

दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक ATM मध्ये खडखडाट

मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील अनेक शहरांतील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळला. त्यामुळे अनेक नागरिकांना पुन्हा नोटाबंदीच्या काळातील मन: स्ताप सहन करावा लागला. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे 1 एप्रिल रोजी बँकांचे कामकाज बंद होते. तर रविवारी बँकांना सुट्टी, आणि मंगळवारी रामनवमीच्या सुट्टीमुळे राज्यातील सर्व एटीएम रिकामे झाले होते. त्यातच रिझर्व बँकेकडून बँकांना अपेक्षित आर्थिक पुरवठा होत नसल्याने एटीएममधूनही मुबलक रक्कम उपलब्ध करुन देण्यात येत नव्हती. याचाच परिणाम गेल्या दोन दिवसांमध्ये दिसून येत होता. औरंगाबादमधील 700 पैकी बोटावर मोजण्या इतक्याच एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांना पैसे असलेल्या एटीएम सेंटरच्या शोधात चांगलीच पायपीट करावी लागली. शहरातील सिडको-हडको, जवाहर कॉलनी, सूतगिरणी, उल्कानगर आदी परिसरातील बहुतांश ठिकाणचे एटीएम रिकामे होते. त्यामुळे नागरिकांना चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागला. दोन दिवसात महाराष्ट्रातील अनेक ATM मध्ये खडखडाट तर दुसरीकडे रविवारी 3 मार्च रोजी नवी मुंबईतील पनवेल जवळच्या कामोठ्यामध्ये असेच काहीसे चित्र होते. कामोठेमधील सर्व एटीएममध्ये खडखडाट होता. त्यामुळे नागरिकांना पैसे असलेल्या एटीएमचा शोध घ्यावा लागत होता. कामोठ्यातील सेक्टर 22 मधील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध असल्याने नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 2 एप्रिल रोजी मुंबईच्या अंधेरीमधील चकाला परिसरातील सर्व एटीएम सेंटर रिकामे होते. तर पुण्यात 9 एटीएम सेंटर पैकी एकच एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध असल्याने पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. एटीएममध्ये खडखडाट असल्याचे पाहून अनेकांना सरकारने पुन्हा अघोषित नोटाबंदी केली असल्याची अनेकांची भावना होती. बँकांकडून पुकारण्यात आलेल्या अघोषित नोटाबंदीमुळे कडाक्याच्या उन्हात चांगलीच दमछाक झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
Narmada Project Meeting : एकीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येण्याची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, अमित शाहांची भेट घेणार
एकीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येण्याची चर्चा, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, अमित शाहांची भेट घेणार

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Embed widget