Nitin Raut : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्याच विजेचा तुटवडा होऊ देणार नाही, कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीज पुरवठा थांबवणार नाही, तसेच मविआ खासगीकरणाचं समर्थन करणार नाही असए वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे.
राज्यात उष्णता वाढल्याने वीजेची मागणी वाढली - नितीन राऊत
राज्यात उष्णतेचा उच्चांक वाढलाय, राज्यात उष्णता वाढल्याने वीजेची मागणी वाढली, कितीही बिकट परिस्थिती आली तरी पुरवठा थांबवणार नाही, सध्य़ा राज्यात वीज प्रकल्प सुरू ठेवण्यात यश आले आहे, राज्यात विजेची मागणी आज २८ मेगावॅटपर्यंत वाढली, संप मागे घेतला नाही म्हणून बैठक रद्द करण्यात आली आहे, वीज कामगारांच्या संपावर कर्मचारी संघटनेशी चर्चा केली असून कोळसा टंचाई लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवलं असल्याचंही राऊत म्हणाले, कामगार नेत्यांसाठी चर्चेची दारं खुली असून कामगार नेत्यांशी चर्चेला सरकार तयार असल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या तरी लोडशेडिंग नाही
आम्ही मेस्मा लावलेला आहे, जे कर्मचारी कामावर जाणार नाहीत त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई होईल, उर्जामंत्री म्हणून कामगार संघटनांशी चर्चा करणार आहे.संघटनांनी विनंती आहे की सलोखा ठेवावा. संप मागे घ्यावा, राज्यसरकारला सहकार्य करावे, संप सुरु असतांनाही जे कामगार कामावर आलेत त्यांना धन्यवाद असे राऊत म्हणाले. प्रधान सचिव कंट्रोल रुममधून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय. संपात सहभागी न होता कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना सलाम आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं असं उर्जामंत्री म्हणालेत. तसेच संपामुळे उद्भवलेल्या स्थितीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असल्याचंही नितीन राऊत म्हणाले.
वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आणि सरकारचा सहकार्य करावे
राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आणि सरकारचा सहकार्य करावे असे नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Modi : 1 एप्रिल रोजी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
- मध्य प्रदेशातील 5 लाख 21 हजार कुटुंबांना मिळणार स्वप्नांचं घर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहप्रवेश
- Amaranth Yatra : 30 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, 43 दिवस चालणार, कोरोनामुळे यात्रा दोन वर्षे होती रद्द
- Viral Video : टॉम अॅन्ड जेरीचा खेळ... उंदराची शिकार करणाऱ्या मांजरीची फजिती, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही