Aaditya Thackeray : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असतील. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे 28 ते 30 मार्चपासून कोकण दौऱ्यावर आहेत. काल आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात होते. राणे आणि शिवसेना यांच्यातलं नातं कसं आहे हे काही सांगण्यासाठी जाणकार किंवा ज्योतिषी असण्याची गरज नाही. राणे कुटुंबियांनी विविध मुद्द्यांवरुन सातत्याने राज्याचे पर्यावरण तसंच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात काल आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. आज आदित्य ठाकरे रत्नागिरीत असणार आहे.  


मंत्री आदित्य ठाकरेंच्या राजापूर दौऱ्याआधी जोरदार बॅनरबाजी


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणारमधील रिफायनरी राजापूर तालुक्यात अन्य ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरु असताना आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये ठिकठिकाणी प्रकल्पाविरोधात आणि समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आता आदित्य ठाकरे त्यांना भेटणार का? हे पाहावं लागणार आहे.


आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस : 29 मार्च


सकाळी 9 वाजता : लांजा, रत्नागिरीकडे प्रयाण
सकाळी 10.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती
सकाळी 11 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : पाली, रत्नागिरीकडे रवाना
दुपारी 12 वाजता : पाली, राखीव
दुपारी 1.30 वाजता : गणपतीपुळेकडे प्रयाण
दुपारी 2.15 वाजता : श्रींचे दर्शन
दुपारी 2.30 वाजता : भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 3.30 वाजता : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ बोट क्लबची पाहणी
दुपारी 3.45 वाजता : जयगड जेट्टीकडे प्रयाण
दुपारी 4.10 वाजता : जयगड जेट्टी इथे आगमन, फेरी बोटीने तवसाळकडे प्रयाण
दुपारी 4.40 वाजता : गुहाकरडे प्रयाण
संध्याकाळी 5.30 वाजता : वेळणेश्वर इथे भूमिपूजन आणि मेळाव्याला उपस्थिती
रात्री : गुहागरमध्ये मुक्काम


आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा तिसरा दिवस : 30 मार्च


सकाळी 8.15 वाजता : सावर्डेकडे प्रयाण
सकाळी 9.05 वाजता : चित्रकला महाविद्यालयाला भेट आणि स्वर्गीय निकम यांच्या समाधीस्थळाला भेट
सकाळी 9.20 वाजता : पेठमाप, चिपळूणकडे प्रयाण
सकाळी 9.30 वाजता : उपक्रमाची पाहणी, लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती
सकाळी 10 वाजता : दापोलीकडे प्रयाण
सकाळी 11.30 वाजता : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 12 वाजता : महाड, रायगडकडे प्रयाण
दुपारी 2 वाजता : महाडमध्ये आगमन
दुपारी 2.40 वाजता : लोणेरे, माणगावकडे प्रयाण
दुपारी 3 वाजता : भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती
दुपारी 4.15 वाजता : मेळाव्याला उपस्थिती
संध्याकाळी 5.30 : मुंबईकडे प्रयाण
रात्री 8.30 वाजता : मुंबईत आगमन