एक्स्प्लोर

जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, नितीन गडकरींचं वक्तव्य

जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता, एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. सोबतच गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

पिंपरी चिंचवड : जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात बोलत होते. जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता, एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. सोबतच गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी, असंही गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, तुमच्याकडे किती जात आहे याची मला कल्पना नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यातून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय, जो जातीचं नाव काढेल त्यांना ठोकून काढेन. जातीय वाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणी छोट्या जातीचा, कोणी मोठया जातीचा असता कामा नये. एकात्मता, पूर्ण खंड असा समाज व्हायला हवं हीच संकल्पना आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले. टिळक आणि आगरकरांचे विचार मांडताना स्वराज्य आणि सुराज्य महत्वाचं असल्याचं गडकरी म्हणाले. स्वराज्य तर मिळालं पण आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय. आपल्या देशाला आर्थिक दृष्ट्या जगातील महाशक्ती बनवायचं आहे. गरिबी, भूकमारी, बेरोजगारी संपवायची आहे. सोशीत आणि वंचितांचे जीवन बदलवून, सामर्थ्य राष्ट्र निर्माण करायचं आहे. अशी अपेक्षा ही गडकरींनी व्यक्त केली. तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांचे ही गडकरींनी कान टोचले. कान टोचतानाचा एक प्रसंगही त्यांनी सांगितला. वंचित समाजातल्या एका महिलेला तीस हजार रुपये देऊन, निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. सहसा तर मी स्थानिकांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटपाचे निर्णय घेत असतो, पण यावेळी मी तस केलं नाही. पण नंतर ती महिला निवडून येणार नसल्याचे मला अनेकांनी पटवून दिलं. मग मी त्या महिलेची माफी मागून, तुम्ही निवडून येणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. तेंव्हा त्या महिलेने मग निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्या, असं खुल्या मनाने सांगितले. बरं पर्स मधून अठरा हजार रुपये परत केले आणि उर्वरित खर्च झालेली रक्कम परत देईन असं ही अाश्वासित केलं. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. पण हल्ली सुशिक्षित कार्यकर्ते मात्र लगेच नाराज होऊन, जाहीरपणे व्यक्त ही होतात. असं म्हणत नाराज होणाऱ्यांचे गडकरींनी कान टोचले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Shardiya Navratri 2026: ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
ना बसायचं, ना झोपायचं! चक्क 9 दिवस उभं राहून देवीचा जागर? साताऱ्यातील 'या' गावची 350 वर्षांची अनोखी परंपरा!
Aaple Sarkar: मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! राज्यभरातील आपले सरकार पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?
Gadchiroli Crime: भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ
भाजप नगरसेवकाला इलेक्ट्रिक कामांसाठी कमिशन घेणं भोवलं; कंत्राटदाराकडून 1 लाख 20 हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं, गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Thane Crime Pradeep Purnekar: टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
टल्ली आणि पपलूला खोदून खोदून विचारलं, पण 'त्या' गोष्टीबद्दल काहीच सांगेनात, पोलीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget