एक्स्प्लोर

नितीन आगे हत्या: फितूर साक्षीदारांची कोर्टात हजेरी

सर्व फितूर साक्षीदारांनी आम्ही प्रत्यक्षदर्शी नाही, घटनेबाबत काहीच माहिती नाही, पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा केला.

अहमदनगर: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बहुचर्चित नितीन आगे हत्याप्रकरणी 13 फितूर साक्षीदारांनी न्यायालयात म्हणणं सादर केलं. गेल्या आठवड्यात बारा जणांनी तर बुधवारी एका फितूरानं  जिल्हा सत्र न्यायालयात म्हणणं मांडलं. सर्व फितूर साक्षीदारांनी आम्ही प्रत्यक्षदर्शी नाही, घटनेबाबत काहीच माहिती नाही, पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा केला. 13 पैकी आठ जणांनी 164 नुसार जबाब दिला, मात्र त्यांनीही पोलीसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचं म्हटलं आहे. तर दोन पंचानी आमच्या फक्त सह्या घेतल्या असून, आम्ही घटनास्थळी नसल्याचं म्हटलं आहे. नितीन आगे हत्याच्या खटल्यात न्यायाधीश हूड यांनी निकाल दिला होता. त्यामुळं आता फितुरांची सुनावणी ही त्याच्यांसमोरच घेण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली. याबाबतचा अर्ज प्रधान जिल्हा न्यायाधीश प्रकाश माळी यांच्याकडं सादर करण्यात आला. याबाबतची पुढील  22 जानेवारीला होणार आहे. नितीन आगेची हत्या 2014 साली प्रेमप्रकरणातून झाली होती. मात्र याप्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर  164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र  13 साक्षीदार फितूर झालेत. शिक्षक बाळू गोरे, रमेश काळे आणि साधना फडतरे आणि शिपाई विष्णू जोरे यांच्यासह 13 जण फितूर झाले. तर नितीनचे आई, वडील, दोन बहीण आणि पंचनामा करणारे तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अधिकारी हे सरकारच्या बाजूनं राहिले आहेत. त्यामुळं 13 फितूर साक्षीदारांवर कारवाईचा आदेश दिल्यानुसार न्यायालयीन कामकाज सुरु झालं आहे. त्यानुसार सदाशिव होडशीळ, विकास डाडर, रमेश काळे, रावसाहेब सुरवसे, लखन नन्नवरे, बबलू जोरे, विष्णू जोरे, सदाशिव डाडर, साधना फडतरे, राजेंद्र गिते, अशोक नन्नवरे, हनुमंत मिसाळ, राजू जाधव यांनी म्हणणं मांडलंय. नितीन आगे हत्या प्रकरण काय आहे? 28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता. या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते. या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता. नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर 164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र 13 साक्षीदार फितूर झाले. संबंधित बातम्या नितीन आगे हत्या खटला पुन्हा नव्याने चालणार  नितीन आगे हत्या : 13 फितूर साक्षीदार कोर्टात हजर राहणार! नितीन आगे हत्या प्रकरणातील 13 फितुरांवर कारवाई होणार ''कोपर्डी निकालानंतर आनंद व्यक्त करणारे नितीन आगे प्रकरणी गप्प का"?  'नितीन आगे खूनप्रकरणी हायकोर्टात धाव घेऊ'  नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार : राजकुमार बडोले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?Ambadas Danve : अंबादास दानवेंवरील कारवाईचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेधCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 03 जुलै 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget