Nilesh Rane chaos near court : भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर नितेश गाडीत बसून निघण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी सिंधुदुर्ग कोर्टाबाहेरच खासदार निलेश राणे यांचा पोलिसांसोबत वाद झाला. यावेळी निलेश यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याने आता शिवसेना त्यांच्याविरुद्ध आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणेंविरोधात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. निलेश यांनी सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर पोलीसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दरम्यान त्यामुळे आता निलेश राणे यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार अर्ज देणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. 



सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार  वादात अडकले आहेत. हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान आज कोर्टाने नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता होती पण सुप्रीम कोर्टानं 10 दिवसांची मुदत दिल्यानं पोलीस त्यांना अटक करु शकत नाहीत अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. पण पोलिसांनी नितेश यांची गाडी अडवली असता निलेश यांनी पोलिसांसोबत घातलेला गोंधळाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.



आज काय घडलं कोर्टात?


सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज कोर्टात नितेश राणेंचा जामीन मेंटेनेबल नाही त्यामुळे फेटाळला असल्याचं सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे प्रथम न्यायालयाला शरण आलं पाहिजे होतं, मग अर्ज करणे अपेक्षित होते. न्यायालयात शरण न येताच जामीन अर्ज केला, त्यामुळे तो मेंटेनेबल नाही. असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांची मुदत दिली आहे त्यामुळे कोठडी देता येणार नसतानाही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली ही पोलिसांची दादागिरी आहे. तसंच हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असं ते म्हणाले.   



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha