Raosaheb Danve: देशातील रेल्वे अतिक्रमणांबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा केलीय. देशातील रल्वेच्या  जागांवर असलेली वेगवेगळी अतिक्रमणं सध्या पाडली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर रेल्वे बोर्डानं प्रत्येक विभागाला रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळं पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने सुद्धा कारवाई करण्याआधी रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या रेल्वे जमिनीवर बांधलेल्या घरांना नोटीसा पाठवल्या. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवर बांधलेले घर सात दिवसात खाली करावेत, असं सुद्धा या नोटीसमध्ये म्हटलं होतं. 

दरम्यान, रावसाहेब दानवे म्हणाले आहेत की, रल्वेच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या सूचनाही आहेत. पण आत्ता अतिक्रमण काढलं तर झोपडपट्टीधारकांना कुठलाही आधार नाही. नोटीस जरी सात दिवसांची असली तरी कुठलंही अतिक्रमण तूर्तास उठणार नाही. 13 फेब्रुवारीला यासंदर्भात एक बैठक होईल त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. रावसाहेब दानवेंच्या घोषणेनंतर आता रेल्वेच्या जागेत बांधकाम असणाऱ्या वेगवेगळ्या भागातील लोकांना दिलासा मिळालाय.

केंद्रीय अर्थसंकल्पावर रावसाहेब दानवे काय म्हणाले?केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. निर्मला सीतारमण यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पाचं वाचन केलं. निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रेल्वेसाठी मोठी घोषणाही केली. पुढील 3 वर्षांत 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या चांगल्या क्षमतेने चालवल्या जातील, असं निर्मला सितारमण अर्थसंकप्लात म्हटलं आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान, रावसाहेब म्हणाले की, जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पण आपल्या देशानं स्थिती सावरली. गेल्या वर्षी रेल्वेला 1 लाख 7 हजार कोटी रुपयांचे बजेट होतं. गाड्यांची संख्या 75 वरून 400 वर जाणार आहे. गेल्या वर्षी रेल्वेला 1 लाख 7 हजार कोटी रुपयांचे बजेट होतं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेल्वेला इतके पैसे मिळाले, असंही दानवेंनी म्हटलंय.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha