एक्स्प्लोर

1200 रोडरोमियोंना दणका, पंढरपुरात 'निर्भया' पथकाची कारवाई

पंढरपूर : शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंना पोलिसांच्या निर्भया पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि अकलूज परिसरात 1200 पेक्षा जास्त तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. शाळकरी मुलींना तरुणांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंढरपूर आणि माळशिरस या दोन्ही तालुक्यात निर्भया पथकाकडून रोडरोमियोंना चाप बसवण्यास सुरुवात करण्यात आली. या निर्भया पथकाची दहशत रोडरोमियोंमध्ये पसरल्याचं चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अशा रोडरोमियोंवर कडक कारवाई केल्याने मुलींना कोणत्याही अडचणींशिवाय पेपर देता आले. मुली आणि पालकांकडून माहिती घेत पोलिसांनी त्यांच्या विभागात रोडरोमियो आणि तरुणांकडून त्रास होणारी ठिकाणे निश्चित केली. त्या ठिकाणी निर्भया पथकामार्फत तरुणांचं शूटिंग काढून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या रोडरोमियोंचे आई-वडील आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या मुलाचे प्रताप त्यांच्यासमोर आणले. पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वात मोठं महाविद्यालय आहे. जवळपास 10 हजार मुलामुलींचा येथे राबता असतो. ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी बसने पंढरपुरात येतात. या मुलींची बस स्थानकावरच छेड काढली जाते. पोलिसांनी अशा सर्व जागा हेरून त्या त्या ठिकाणी निर्भया पथकाचा वावर ठेवला. रोमियोगिरी करणाऱ्या तरुणांना उचलून कारवाईस सुरूवात केली. निर्भया पथकातील पुरुष कर्मचारी महाविद्यालय, कोचिंग क्लासेसच्या बाहेर थांबून रोडरोमियोंवर लक्ष ठेवतात. यावेळी टगेगिरी करताना कोणी रोमियो आढळला की लगेच त्याची उचलबांगडी करून त्याच्या पालकांना बोलावणं धाडलं जातं. वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साहही वाढला आहे. निर्भया पथकाच्या तरुणांमध्ये तयार झालेल्या दहशतीमुळे छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget