LIVE UPDATES | राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं नुकसान
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... शहराचे नामांतर हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम नाही : बाळासाहेब थोरात टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या हाती आता सबळ पुरावे : राज्य सरकार मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड काळुबाईचे मंदिर एक महिना बंद, यात्रेसह पै पाहुण्यांवरही बंदी
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
07 Jan 2021 09:42 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत थोड्याच वेळात मराठा समाजातील नेत्यांची बैठक. बैठकीला मराठा समाजातील विविध नेते पोहचले. आमदार विनायक मेटे, मराठा क्रांती मोर्चाचे राजन घाग, ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील, महाराष्ट्र क्रांती सेनेचे सुरेश पाटील उपस्थित. बैठकीत 25 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीबाबत चर्चा होणार. 25 जानेवारीला मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी. कोर्टातील सुनावणीबाबत सरकारच्या तयारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा नेत्यांना माहिती देणार.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनकर पाटील यांनी स्वीकारला आहे
दिनकर पाटील हे बालभारतीचे संचालक पदावर कार्यरत असून शकुंतला काळे यांच्या निवृत्तीनंतर अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विरेगाव जवळ दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या धडकेत दुचाकीवरील विष्णू गारोडी (वय वर्ष 55) तर मंगलाबाई गारोडी (वय वर्ष 50) हे जागीच ठार झाले. मूळ भोकरदन तालुक्यातील वालसांगावी गावचे रहिवाशी असलेले हे पती पत्नी भोकरदन येथे लग्नाला जात असताना त्यांचा हा अपघात झाला.
नाशिकमध्ये आज दुपारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली . यामुळे नागरिकांची तारांबळ तर उडाली. याशिवाय द्राक्ष, कांदे, गहू, डाळिंब यांसह भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड आणि सिन्नर तालुक्यातील काही भागात तर तूफान पाऊस झाला असून द्राक्षबागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे गावातील कडवा कालवा परीसरातील तानाजी संगमनेरे यांच्या अडीच एकरातील बागेत झालेल्या नुकसानीचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार ह्यांचा पासपोर्ट जप्त, भाजपचे माजी आमदार मितेश भांगडीया ह्यांनी तक्रार केली होती की वडेट्टीवार ह्यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या. अनेक वेळा तक्रार केली, कारवाई झाली नाही तेव्हा भांगडिया हायकोर्टात गेले.
परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्ग 222 वर वाहतूक ठप्प, राहटी पुलावर अपघात झाल्याने वाहतुकीचा खोळंबा, 2-2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, तासाभरापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प, पोलीस घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनाला हटवण्याचे काम सुरू
पोलीस भरतीबाबतचा चार जानेवारीचा जीआर रद्द केला, सरकार शुद्धीपत्रक काढणार, गृहमंत्र्यांची घोषणा
शिवसेना नेते संजय राऊत नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर,
आज शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन करणार,
येत्या काळात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार वसंत गीते, आणि सुनील बागुल शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला विशेष महत्त्व,
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दौरा महत्वाचा,
, संघटनात्मक बांधणी केली जाणार,
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वगृही भाजपात प्रवेश केल्यानंतर जशास तसे उत्तर देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न
Maharashtra News : नांदेड येथील IDBI बँकेत ऑनलाइन दरोडा
नांदेड येथील IDBI बँकेतून शंकर नागरी बँकेच्या खात्यातील रकमेविषयी शंकर नागरी बँकेची आक्रमक भूमिका, हॅकरने पळवलेली 14 कोटी रुपयाची रक्कम IDBI बँकेने तात्काळ शंकर नागरी बँकेच्या खात्यात जमा करण्याची मागणी, अन्यथा हायकोर्टात जाण्याचा इशारा शंकर नागरी बँकेकडून देण्यात आला आहे.
काल नांदेड शहरातील वजीराबाद येथील बँकेत 14 कोटी रुपयाचा ऑनलाईन दरोडा पडला होता. यात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल 14 कोटींच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारला. या विषयी IDBI बँकेचे शाखा व्यवस्थापक रुपेश कोडगिरे यांच्याशी बोलल्या नंतर या ऑनलाईन चोरी विषयी IDBI बँकेचं काही घेणेदेणे नाही, असे सांगून काहीही बोलण्यास नकार दिला होता.
मात्र या विषयी शंकर नागरी बँकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही IDBI बँकेचे खातेदार असून रिजर्व बँकेच्या नियमानुसार आमच्या पैशांची सर्व जबाबदारी IDBI बँकेची आहे, असं ठणकावून सांगितले. ही जबाबदारी IDBI बँक झटकून टाकत असेल आम्हाला हायकोर्टात जावं लागेल, असा इशारा शंकर नागरी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिला आहे. एवढ्या मोठ्या धाडसी दरोड्याबाबत शिवाजीनगर पोलिसात शंकर नागरी बॅंकेकडून लेखी तक्रार देण्यात आलीय मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
बीड : परळी पंचायत समिती सभापतीवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. सभापती उर्मिला गित्ते यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. ठरावाला भाजपच्या दोन सदस्यांची राष्ट्रवादीला मदत झाली आहे. राष्ट्रवादी- भाजप सदस्य एकत्र आल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विरोधात आणि सत्ताधारी पक्षाकडून आरोपींना मिळत असलेल्या राजकीय संरक्षणाविरोधात भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. खासकरून राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्यपालांकडे केली.
मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विरोधात आणि सत्ताधारी पक्षाकडून आरोपींना मिळत असलेल्या राजकीय संरक्षणाविरोधात भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. खासकरून राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्यात यावी. अशी मागणी चित्रा वाघ यांनी राज्यपालांकडे केली.
94 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार अशी चर्चा असतानाच स्थळ पाहणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाची इमारत आणि मैदानाची पाहणी केली. समितीचा पाहणी अहवाल साहित्य महामंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. त्यानंतर संमेलन कुठे घायचं यावरनिर्णय घेतला जाणार आहे. नाशिक व्यतिरिक्त इतर कुठल्याही शहराची अथवा जागेची पाहणी केली नसल्याने उद्याच्या बैठकीत नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने संमेलन नाशिकमध्ये घेण्याची मागणी केली होती.
कणकवली : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात कणकवली मुंडे डोंगरी येथून ट्रॅक्टर रॅलीला सुरवात झाली असून भाजप कार्यालयासमोर येऊन त्याचे सभेत रूपांतर झाले आहे. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल बोंडे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. ही ट्रॅक्टर रॅली भाजप कार्यालयासमोर येऊन सभेत रूपांतर झालं. त्यानंतर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात जाणार आहे.
अमरावती : आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात मुंबई येथील ईडी कार्यालयात (ED) कागदपत्रं सादर केली त्याला आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत उत्तर दिलं. दुसऱ्याला बदनान करण्याचा प्रयत्न हे दांपत्य नेहमी करत असतात. लवकरच या दोघांचं पद जाणार आहे. म्हणून हे असले आरोप राणा दाम्पत्य करत राहतात, असं आनंदराव अडसूळ म्हणाले.
अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील कुंभी वाघोली या गावातील मुलांनी काल सायंकाळी चंद्रज्योतिच्या बिया खाल्ल्याने त्यांची प्रकृती खालावली. मुले खेळत असताना चांद्रज्योतिच्या झाडाखाली पडलेल्या बिया खाल्ल्याने त्यांना अस्वस्थ जाणवू लागलं. काही वेळातच त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. मुले अस्वस्थ असल्याने पालकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यात 18 मुलांचा समावेश होता. दरम्यान दोन मुले बेशुद्ध झाली असून त्याच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नागपूर : नागपुरातील छावणी परिसरात एका दोन मजली इमारतीला भीषण आग लागली होती. सकाळी अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर ती दुमजली इमारतीत सर्वत्र पोहोचली. या इमारतीत बाईक पॉलिश करण्यासाठीचे केमिकल ग्राउंड फ्लोअरवर साठवले होते, तर दुसऱ्या माळ्यावर फटाक्यांचा साठा होता. तर वरच्या तिसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहत होतं. ज्वलनशील पदार्थांमुळे इमारतीत आग झपाट्याने पसरली. तर दुसऱ्या मजल्यावर फटाकेही फुटण्याचा आवाज येत होता. दुकानातील केमिकल जळत असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. दरम्यान अग्निशमन दल वेळेत पोहचले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी आजू बाजूच्या घरावरून पाण्याचा मारा केला आणि आग वेळीच नियंत्रणात आणली. दाटीवाटीचा परिसर असल्याने शेजारच्या इमारतींमध्ये आग पसरण्याचा धोका होता. मात्र आग वेळीच नियंत्रणात आणल्याने पुढील धोका टळला.
नागपूर : नागपुरातील छावणी परिसरात एका दोन मजली इमारतीला भीषण आग लागली होती. सकाळी अकराच्या सुमारास आग लागल्यानंतर ती दुमजली इमारतीत सर्वत्र पोहोचली. या इमारतीत बाईक पॉलिश करण्यासाठीचे केमिकल ग्राउंड फ्लोअरवर साठवले होते, तर दुसऱ्या माळ्यावर फटाक्यांचा साठा होता. तर वरच्या तिसऱ्या मजल्यावर एक कुटुंब राहत होतं. ज्वलनशील पदार्थांमुळे इमारतीत आग झपाट्याने पसरली. तर दुसऱ्या मजल्यावर फटाकेही फुटण्याचा आवाज येत होता. दुकानातील केमिकल जळत असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. दरम्यान अग्निशमन दल वेळेत पोहचले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी आजू बाजूच्या घरावरून पाण्याचा मारा केला आणि आग वेळीच नियंत्रणात आणली. दाटीवाटीचा परिसर असल्याने शेजारच्या इमारतींमध्ये आग पसरण्याचा धोका होता. मात्र आग वेळीच नियंत्रणात आणल्याने पुढील धोका टळला.
मुंबई : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या शहराचं, परिसराचं नाव बदलून तिथलं वातावरण बिघडवू नका, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. जरी शहराचं नाव बदललं गेलं तरी लोकांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? काय फरक पडतो? असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
सुबोध जयस्वाल यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी
बुलढाणा : जिल्ह्यात कॉंग्रेस तर्फे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्राच्या कृषी विधेयकाला विरोध म्हणून ठिकठिकाणी दोन दिवस मौन व्रत आणि उपवास करण्यात येत आहे. आज शेगाव येथे गांधी चौकात आंदोलन सुरु झालं आहे.
भिवंडीतील काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याप्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतल आहे. दीपक म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणि याचाच राग मनात धरून सदरील गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. 3 जानेवारी रोजी दीपक म्हात्रे पत्नीबरोबर भावाने घेतलेली मोटर सायकल पहात होते. याच दरम्यान अचानक दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञात इसमांनी तीन राऊंड फायर केले. यात म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या गेल्या. दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे, प्रथम भोईर आणि वैभव भोकरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या पूर्वीही तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अधिक तपास आता पोलीस करत आहेत
भिवंडीतील काल्हेर येथील शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान याप्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेतल आहे. दीपक म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आणि याचाच राग मनात धरून सदरील गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. 3 जानेवारी रोजी दीपक म्हात्रे पत्नीबरोबर भावाने घेतलेली मोटर सायकल पहात होते. याच दरम्यान अचानक दीपक म्हात्रे यांच्यावर अज्ञात इसमांनी तीन राऊंड फायर केले. यात म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या गेल्या. दरम्यान भिवंडी गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे, प्रथम भोईर आणि वैभव भोकरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या पूर्वीही तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अधिक तपास आता पोलीस करत आहेत
लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ व्हावं या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या मोर्चाला भव्य रुप मिळालं आहे. गांधी मैदानापासून सुरु झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून महामार्गावर पोहोचली. त्यानंतर तावडे हॉटेल मार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली. लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या काळातील वीज बिलं माफ करावीत अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरात जोर धरुन आहे. अनेक आंदोलने केली मात्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या वीज बिलांच्या विरोधात भव्य रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर देखील जर सरकारने वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ व्हावं या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. या रॅलीमध्ये संघटना आपली वाहनं घेऊन सहभागी झाल्याने या मोर्चाला भव्य रुप मिळालं आहे. गांधी मैदानापासून सुरु झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून महामार्गावर पोहोचली. त्यानंतर तावडे हॉटेल मार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली. लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे या काळातील वीज बिलं माफ करावीत अशा पद्धतीची मागणी कोल्हापुरात जोर धरुन आहे. अनेक आंदोलने केली मात्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या वीज बिलांच्या विरोधात भव्य रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर देखील जर सरकारने वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे : धुळ्यात एका नवदाम्पत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील बळसाणे इथे लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे आणि त्याची पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे शेताची काम उरकत होते. यावेळी पतीला पिण्याचं पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू विहिरीतून पाणी काढताना तिचा तोल गेला. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही विहिरीत उडी मारली. परंतु विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघे जण तळाला गेल्या आणि या नवदाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. यानंतर सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पुन्हा एकदा इंधनदरवाढीला जनतेला सामोरं जावं लागतंय. मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रूपये प्रतिलिटर तर 80.76 रूपये प्रतिलिटरवर पोहचले आहेत. गेल्या 10 महिन्यांत 14 रूपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे खचलेल्या सर्वसामान्य माणूस या इंधन दरवाढीमुळे होणा-या महागाईच्या चिंतेत आहे.
केडीएमसीचे भाजप नगरसेवक व विकासक मनोज रायला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी. जागेच्या वादातून हाणामारीप्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. चार महिन्यानंतर अटक झाली आहे.
बांधकाम विकासकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर,
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी,
बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा,
याआधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने केला होता विरोध,
सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी,
विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला मागे , विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या समोर सभेत निर्णय फिरविला
कोल्हापुरातील दसरा चौकातल्या तनिष्क शोरुममध्ये ग्राहक बनून आलेल्या तीन महिन्यांनी सोन्याच्या बांगड्या लांबवल्या. एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या दोन बांगड्या महिलांनी लंपास केल्या.
सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवत या महिलांनी हे कृत्य केलं. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या महिलांविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून समन्स, चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाव नाना शंकरशेठ टर्मिनस होणार. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची माहिती.
पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकवार जवळ मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर तीन वाहनांचा भीषण अपघात होऊन लागली भीषण आग लागली.
रात्री 3.30 वाजता ही घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने आग लागली.
भाजपचे दयाशंकर तिवारी यांची नागपूरचे नवे महापौर म्हणून निवड झालीय. आज नागपूरच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होऊन दयाशंकर तिवारी मोठ्या मताधिक्याने महापौरपदी निवडून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत तिवारी यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. भाजपचे दयाशंकर तिवारी यांना १०७ मतं मिळाली, तर महाविकास आघाडी कडून काँग्रेस उमेदवारचे रमेश पुणेकर यांना २७ मतं मिळाली. बहुजन समाज पक्षाच्या नरेंद्र वालदे यांना १० मतांवर समाधान मानावे लागले. तर पाच नगरसेवक अनुपस्थित राहिले.
दयाशंकर तिवारी नागपूरचे ५४ वे महापौर आहेत. महापालिकेच्या इतिहासात आज प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदाची निवडणूक झाली. सर्व नगरसेवक मोबाईल आणि लॅपटॉपवरून या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. उपमहापौरपदी भाजपच्या मनीषा धावडे यांची निवड झाली. राज्य शासनाने कट रचून ऑनलाइन पद्धतीने निवडणूक घ्यायला लावत निवड प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ बनवल्याचा आरोप यावेळी दयाशंकर तिवारी यांनी केला. दरम्यान या एकतर्फी निवडणुकीत काँग्रेस पक्षातली गटबाजी खास चर्चेचा मुद्दा ठरली. महापौर पदासाठी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांनी परस्पर दोन उमेदवार दिले होते. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या गटातून मनोज गावंडे यांना तर आमदार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटातून रमेश पुणेकर यांना महापौर पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. पराभव निश्चित दिसताना ही नागपूर काँग्रेसमधील ही गटबाजी काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत ही पोहोचली होती. अखेर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना हस्तक्षेप करत वनवे गटाला माघार घ्यायला सांगावे लागले. त्यानंतर काँग्रेसच्या मनोज गावंडे यांनी आज सकाळी माघार घेतली. आणि निवडणुकीत काँग्रेस पक्षाची एकसंघता कायम ठेवणे शक्य झाले.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका ( मराठा समाजाचे आरक्षण ) प्रकरणी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष समुपदेशी (Special Counsel) म्हणून अॅड.कपील सिब्बल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची फी अदा करण्यास आज मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
त्यास अनुसरुन ॲड.कपील
सिब्बल विशेष, समुपदेशी (Special Counsel यांची उपरोक्त याचिकेप्रकरणी शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष समुपदेशी (Special Counsel) म्हणून नियुक्ती करण्यात येत असून त्यांना पुढीलप्रमाणे फी अदा करण्यास याद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे-
अॅड.कपील सिब्बल, विशेष समुपदेशी (Special Counsel) यांना प्रत्येक सुनावणी उपस्थिती आणि सुनावणीपूर्वीची विचारविनिमय फी रु.१०,००,०००/- (रुपये दहा लाख )
यासाठी येणारा खर्च विधी विभागाच्य्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका ( मराठा समाजाचे आरक्षण ) प्रकरणी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष समुपदेशी (Special Counsel) म्हणून अॅड.कपील सिब्बल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची फी अदा करण्यास आज मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
त्यास अनुसरुन ॲड.कपील
सिब्बल विशेष, समुपदेशी (Special Counsel यांची उपरोक्त याचिकेप्रकरणी शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष समुपदेशी (Special Counsel) म्हणून नियुक्ती करण्यात येत असून त्यांना पुढीलप्रमाणे फी अदा करण्यास याद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे-
अॅड.कपील सिब्बल, विशेष समुपदेशी (Special Counsel) यांना प्रत्येक सुनावणी उपस्थिती आणि सुनावणीपूर्वीची विचारविनिमय फी रु.१०,००,०००/- (रुपये दहा लाख )
यासाठी येणारा खर्च विधी विभागाच्य्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या नागपुरातील मुख्यालयावर बेरोजगार तरुणांचा मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या मुख्यालयाच्या दारावर मोर्चा अडवला आहे. मोर्चा अडवल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खाणींमध्ये स्थानिक तरुणांना कामगार म्हणून रोजगार मिळावा आणि 2018 पासून बंद केलेली कामगार भरती सुरू करावी तसंच परराज्यातील तरुणांना महाराष्ट्रातील खाणींमध्ये नोकरी देऊ नये अशी मागणी मोर्चेकरी करत आहेत.
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या नागपुरातील मुख्यालयावर बेरोजगार तरुणांचा मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या मुख्यालयाच्या दारावर मोर्चा अडवला आहे. मोर्चा अडवल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खाणींमध्ये स्थानिक तरुणांना कामगार म्हणून रोजगार मिळावा आणि 2018 पासून बंद केलेली कामगार भरती सुरू करावी तसंच परराज्यातील तरुणांना महाराष्ट्रातील खाणींमध्ये नोकरी देऊ नये अशी मागणी मोर्चेकरी करत आहेत.
देवदर्शनाला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला अपघात, चार ठार, पाच गंभीर...
रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर बेलोरो धडकून चार युवकांचा मृत्यू, पाच जण गंभीर, सर्व युवक नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी गावातील रहिवाशी आहेत.
गणपती पुळे येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या युवकांची बोलेरो गाडी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून चार युवकांचा मृत्यू झालाय.. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वर्ध्या जिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे हा अपघात झाला.
उमरेड तालुक्यातील हिवरा हिवरी येथील हे नवयुवक देवदर्शनासाठी म्हणून गणपती पुळेसाठी सायंकाळी घरून निघाले होते. हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरून खाली उतरताना MH 32 KR 6482 क्रमांकाची भरधाव बोलेरो गाडी रस्त्यावर बंद स्थितीत असलेल्या MH 29 T 1009 क्रमांकाच्या ट्रकवर धडकली. अपघातात चालक शैलेश पंढरी गिरसावळे, आदर्श हरीभाऊ कोल्हे, सूरज जनार्दन पाल आणि मोहन राजेंद्र मोंढे यांचा मृत्यू झाला. जखमींची नावे यश कोल्हे, भूषण राजेंद्र खोंडे, शुभम प्रमोद पाल, प्रणय दिवाकर कोल्हे, समीर अरुण मोंढे अशी आहेत
जालना : जिल्ह्यातील साष्टी पिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन तसेच आमरण उपोषणाची हाक देण्यात आलीय. 20 जानेवारी रोजी या गावात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत ट्रॅक्टर, बैलगाडी आणि मोटार सायकलची भव्य रॅली काढली, दोन्ही सरकारने एक विचाराने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी या रॅलीत करण्यात आली.
सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते.
पुण्यावरून पाठलाग करत गुन्हे शाखेने टेंभुर्णी परिसरातून काळे याना ताब्यात घेतलं आहे.
चीनचा कावेबाजपणा सुरुच. नियंत्रण रेषेवर चीननं तळ ठोकल्याची दृश्य समोर.
भिवंडी : भिवंडीतील 56 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने तब्बल 107 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. तालुक्यातील वळ, निवळी आणि आलिंगर या तीन ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तालुक्यात आता 53 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार असून या 53 ग्राम पंचायतींमधील 12 ग्रामपंचायतींमधील 19 सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे.
नागपूर : महापौर पदाच्या निवडणुकीतून काँग्रेसच्या एका गटाने माघार घेतली आहे. तानाजी वनवे गटाचे काँग्रेस नगरसेवक मनोज गावंडे यांनी महापौर पदाच्या निवडणूकीतून माघार घेतली आहे.
त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर आमदार विकास ठाकरे यांच्या गटातून उभे असलेले काँग्रेसचे रमेश पुणेकर निवडणूक मैदानात कायम आहेत.
मुंबई : डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक, डबेवाल्यांना मोफत दुचाकी दिल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांची कारवाई
सांगली : महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्र येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली जतची श्री.यल्लमा देवीची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. तरीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने जत तालुका प्रशासनाकडून दि. 8 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय. जतचे प्राताधिकारी प्रशांत आवटी यांनी ही माहिती दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. कोल्हापूर शहरात देखील रिमझिम पाऊस
गेल्या 106 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर आजपासून या ब्रॉडगेज लाईनच्या सर्व्हेसाठी पहिल्यांदा जालन्यात पाहणी पथक दाखल होत आहे. आजपासून या मार्गाच्या ब्रॉडगेज लाईनच्या सर्व्हेचे काम या पथकाकडून हाती घेतले जाणार आहे. जालना शहरापासून ते खामगावपर्यंतच्या रेल्वे महामार्गाचा सलग तीन दिवस सर्व्हे या पथकाकडून केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाच्या सर्व्हे विभागाचे प्रमुख एस सी जैन यांनी पत्राद्वारे दिली आहे.
गेल्या 106 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर आजपासून या ब्रॉडगेज लाईनच्या सर्व्हेसाठी पहिल्यांदा जालन्यात पाहणी पथक दाखल होत आहे. आजपासून या मार्गाच्या ब्रॉडगेज लाईनच्या सर्व्हेचे काम या पथकाकडून हाती घेतले जाणार आहे. जालना शहरापासून ते खामगावपर्यंतच्या रेल्वे महामार्गाचा सलग तीन दिवस सर्व्हे या पथकाकडून केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाच्या सर्व्हे विभागाचे प्रमुख एस सी जैन यांनी पत्राद्वारे दिली आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही सिंधुदुर्गात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुडाळ, वेंगुर्ले, तालुक्यात रात्री तसेच पहाटे अवकाळी पाऊस कोसळला. पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत. आंबा मोहोरावर भुरी किंवा तुडतुडा तर काजूवर ईमॉस्कोटो आणि करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. कोकणात 7 जानेवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी पहाटे 4 वाजता एपीएमसीमधील भाजी मार्केटला भेट दिली आहे. माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपाची भूमिका हुकूमशाहीची असल्याचंही त्यांनी म्हटलं. ईडी मलाही उद्या नोटीस पाठवेल. ईडीकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
नांदेड :राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या भोकर तालुक्यातील एकूण 63 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 12 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली आहे. यातील एकूण 193 पैकी 52 प्रभाग बिनविरोध आल्यामुळे 141 प्रभागात निवडणूक होणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी भरत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे.
किसान रेलला हिरवा झेंडा दाखवणारे पंतप्रधान मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार, किसान आर्मीचे व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
यवतमाळ : 1 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी घाटंजी येथील पोलीस निरीक्षक राजाभाऊ घोगरे ताब्यात, एसीबीची कारवाई , तक्रारदार यांचा फटाक्याच्या व्यवसाय असून त्यांचेवर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक घोगरे यांनी तक्रारदार यांना सहा लाख रुपयांची मागणी केल्याबाबत तक्रारदारांनी तक्रार दिली होती. घोगरे यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती एक लक्ष रुपये लाच रक्कम पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉडसाठी मागणी करून स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले होते.
आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि भटक्या-विमुक्तांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असतं. त्यासाठी आठ लाख उत्पन्नाची मर्यादा आहे. यापूर्वी या उत्पन्नात शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन हे उत्पन्न म्हणून गृहीत धरलं जायचं पण यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाणार नाही तर फक्त अन्य स्त्रोतापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो नोकरदार, शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. तसे परिपत्रक आज राज्य सरकारने जारी केली आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची हजेरी,
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ,
कोल्हापूर शहरात देखील रिमझिम पाऊस
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अपयश...
9 पैकी फक्त 2 जागा होणार बिनविरोध...
तर 7 जागेंवर निवडणूक होणार...
बैठक घेऊन बिनविरोध घेण्याचा निर्णय झाला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ,
बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज आता 4 जानेवरीऐवजी 18 जानेवारीपर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी बोर्डाच्या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह भरण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे.
बारावी बोर्ड परीक्षेचे अर्ज आता 4 जानेवारीऐवजी 18 जानेवारीपर्यत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील 66 पैकी 65 उमेदवारी अर्ज आज मागे घेण्यात आले आहे. भिसी गावातील विठ्ठल-रुख्माई देवस्थान परिसरात काल एक बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व 66 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उमेदवार व गटनेत्यांनी निर्णय घेतला होता. भिसी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्याची आणि त्यानुसारच निवडणूक घेण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. जवळपास 15 हजार मतदार असलेल्या भिसी गावाला सध्या अप्पर तालुक्याचा दर्जा मिळालेला आहे आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 29 डिसेंबर ला एक GR काढून भिसीला नगर पंचायत करण्यात येत असल्याचा आदेश काढला होता. या GR प्रमाणेच निवडणूक घेण्याची मागणी करत स्थानिक ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलाय.
बीड : जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात एका तरुणाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. इम्तियाज अमिन कुरेशी (वय 30, रा.गेवराई) असं विषारी द्रव प्राशन केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याने विष का घेतलं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतू इम्तियाज व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असून हे प्रकरण पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षात दाखल आहे. या ठिकाणी दोघांचंही समुपदेशन सुरु आहे. सोमवारी या प्रकरणात तिसर्यांदा सुनावणी सुरु करण्यात आली होती. इम्तियाज आणि त्याची पत्नी सुनावणीला हजर होते. याच दरम्यान त्याने कार्यालयाबाहेर येऊन विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे.
मालवणी (मुंबई) : मालाड मारवे रोड येथील अस्मिता ज्योती इमारती जवळ उभ्या असलेल्या स्कूल बसला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल केंद्र बाजूलाच असल्याने अग्निशमन जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन ही आग विझवली. तो पर्यंत ही बस जळून खाक झाली. या आगीमुळे मार्वे रोड वर मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नसून मालवणी पोलीस पुढील तपास करीत आहेत
राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परंतु याचा फटका पिकांना बसत आहे. लातूरमध्ये ढगाळ वातावरण असून त्याचा ज्वारीला फायदा आहे. परंत गहू, हरभरा पिकाला या वातावरणामुळे फटका बसत आहे.
अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत..
राज्यभरातून भारतीय किसान सभेचे जवळपास दीड हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत. त्यातील एक जथ्था मुंबई गुजरात मार्गे तर दुसरा जथ्था नागपूर भोपाळ मार्गे दिल्लीकडे निघाला आहे. दिल्ली जवळच्या शहाजानपूर सीमेवर हे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पुढे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत
अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत..
राज्यभरातून भारतीय किसान सभेचे जवळपास दीड हजार कार्यकर्ते दिल्लीला जाणार आहेत. त्यातील एक जथ्था मुंबई गुजरात मार्गे तर दुसरा जथ्था नागपूर भोपाळ मार्गे दिल्लीकडे निघाला आहे. दिल्ली जवळच्या शहाजानपूर सीमेवर हे सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पुढे मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत
सांगली : मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातून एका आंतरराज्य टोळीतील दरोडेखोराने पलायन केलं आहे. केरामसिंग मेहडा, वय 30 असं या दरोडेखोराचं नाव आहे. कोरोना पॉजिटिव्ह असल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. आज सकाळी त्याने रुग्णालयाच्या बाथरूम मधील खिडकी तोडून पलायन केलं.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 24 डिसेंबर 2020 रोजी सांगलीमधून मध्यप्रदेश मधील दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली होती. या आंतरराज्य टोळीकडून पश्चिम महाराष्ट्रात दरोडे आणि घरफोडीचे दहाहून अधिक गुन्हे उघडकीस आले होते. या प्रकरणी केरामसिंग मेहडा, उदयसिंग मेहडा आणि गुडया मेहडा यासह एका अल्पवयीन बालकास अटक करण्यात आली होती. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील केरमसिंग मेहडा याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात आयसोलेशन वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र सोमवारी सकाळी केरमसिंग याने शौचास जाण्याच्या बहाण्याने खिडकीतून पलायन केलं आहे. रुग्णालयाच्या बाहेर या आरोपीसाठी बंदोबस्त तैनात असताना देखील आरोपी पळाला. या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यानंतर सांगली पोलीस दलाकडून केरमसिंग याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत, तसेच जिल्ह्यात नाकेबंदी करुन आरोपीचा शोध घेतला जात आहे.
तळकोकणात गुलाबी थंडीनेही पाठ फिरवली असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. थंडीनंतर अचानक ढग दाटून आल्याने कोकणातील आंबा, काजू पिकावर यांचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. ढगाळ वातावरण, पाऊस असाच सुरु राहिल्यास आंबा पिकाला मारक ठरणार आहे.
6 जून 1674 ला शिवराज्याभिषेक झाला. हा दिवस आता राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार आहे. ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर गुढी उभारुन हा दिवस साजरा होणार आहे.
बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनीच ही भूमिका घेतल्याचं म्हटलं जात आहे. थोरात आज दिल्लीत असून ते नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे. आता हायकमांड यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली. सुनीता काशिद असं या मृत महिलेचं नाव आहे.
घरातील कचऱ्यातून बाटली दारात आणली आणि दारातील कचरा पेटवल्यानंतर सॅनिटायझर बाटलीचा झाला स्फोट झाला. या स्फोटोत महिला 80 टक्के भाजली. त्यानंतर उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग : तळकोकणात गुलाबी थंडीनेही पाठ फिरवली असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. थंडी नंतर अचानक ढग दाटून आल्याने कोकणातील आंबा, काजू पिकावर यांचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. ढगाळ वातावरण, पाऊस असाच सुरु राहिल्यास आंबा पिकाला मारक ठरणार आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली बाजरपेठेत पहाटे 3 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस व रामचंद्र उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही आगीची झळ पोहचली असून नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग विझविण्यात आली. या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत दुकान मालक आबा उचले, राजेंद्र बाजाजी, नाथा अंधारी यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण,सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता.
मुंबई शेअर बाजाराची विक्रमी उसळी. सेन्सेक्स पहिल्यांदाच 48 हजारांच्या पलीकडे. निफ्टीनं पहिल्यांदाच गाठला 14 हजारांचा पल्ला.
बुलढाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे होणारा "जिजाऊ जन्म उत्सव" सोहळा रद्द झाला आहे. आपण आहात तिथेच जन्मउत्सव साजरा करा, असं आवाहन आयोजन समितीने केलं आहे. हा कार्यक्रम छोट्या स्वरुपात होणार असून त्याच प्रक्षेपण विविध माध्यमातून होणार आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर गर्दी न करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पूजन कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे , पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे येणार आहे. थोडक्यात होणाऱ्या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना या वर्षाचा "मराठा विश्वभूषण पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे.
देशात गरजूंना आणि ज्या नागरिकांना लसीचा खर्च परवडत नाही, त्यांना ती मोफत देण्यात येईल. कोरोनावरील लस मोफत देण्यासाठी सरकारची तयारी.
सातारा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका टाळण्यासाठी राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांनी बिनविरोध निवडणुकांसाठी बक्षीस जाहीर केली आहेत. त्यातील बहुतांश आमदार मराठवाड्यातील आहेत. पारनेर, हातकणंगले, बीड, अकोला, परभणी, करमाळा, बार्शीच्या आमदारांनी बक्षीस जाहीर केलं आहे. त्यामुळे यंदा किती ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होतात हे पहाणं महत्वाचं असेल. सातवी पासची अट, बिनविरोधचे फंडे, आरक्षण यांवर अनेक आक्षेप घेतले जात आहेत. पोपटराव पवारांसह अनेकांनी यावर आक्षेप घेतला आहे.
नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघरमधील नववी ते बारावी शाळा आजपासून सुरु होणार आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होतील. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोरोनास्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत. विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणीसारख्या सुरक्षाउपायांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. तसेच शाळाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही आरटी-पीसीआर आणि कोरोनाचे इतर नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती बंधनकारक असल्याने पुण्यात पहिल्या दिवशी पुण्यातील 50 ते 60 शाळाच सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई आणि ठाण्यातील शाळांसंदर्भातील निर्णय मात्र 15 जानेवारीला होणार आहे.
नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे पाकीट हरवले असून ते चोरी गेले की जिल्हाधिकाऱ्यांकडूनच कुठे गहाळ झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. रविवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका (बालाजी) लॉन्समध्ये थाटामाटात पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह अनेक शासकीय अधिकारी ईथे उपस्थित होते, हजारो नागरिकांनी या लग्नाला हजेरी लावली होती. तगडा पोलिस बंदोबस्त देखिल यावेळी तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्यानंतर आपल्या खिशात पाकीट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले यानंतर मांढरे यांच्यासह पोलिसांनी ईथे शोधाशोध देखिल केली मात्र पाकीट काही मिळून आले नाही.
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शहराचे नामांतर हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम नाही : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
टीआरपी केसमध्ये मुंबई पोलिसांच्या हाती आता सबळ पुरावे : राज्य सरकार
टीआरपी घोटाळ्यासंदर्भात पुढील सुनावणी होईपर्यंत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचं राज्य सरकारने बुधवारी (6 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं अर्णब गोस्वामी आणि एआरजी मीडियाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला अंतरिम दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवला आहे. मात्र, या प्रकरणात संबंधितांविरोधात आता सबळ पुरावे मिळाल्यामुळे पुढील सुनावणीनंतर कारवाई न करण्याबाबत कोणतीही ग्वाही देण्याच्या विचारात मुंबई पोलीस नाही. आज वकील नसल्याने पुढील सुनावणीपर्यंतच आम्ही वेळ देऊ शकतो असे राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हायकोर्टाला सांगितलं.
मुंबई पोलीस सायबर सेलकडून 'जामतारा' घोटाळा उघड; सहा आरोपी गजाआड
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं केलेल्या कारवाई दरम्यान लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी एचपी गॅसची एजन्सी मिळवून देण्याची बतावणी करून बनावट वेबसाइट बनवून त्याद्वारे विविध राज्यातील लोकांची फसवणूक करत होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. देशभरातील 10 हजार नागरिकांना या टोळीने लुबाडल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालं आहे. या आरोपींनी वेबसाइटवरून देशातील वेगळ्या राज्यातील नागरिकांना गॅस एजन्सी देण्याचे अमिष दाखवून अनेकांनी फसवणूक केली. बिहार ,पश्चिम बंगाल राज्यातून हे रॅकेट चालवण्यात येत असल्याचं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात कारवाई केली आहे.
काळुबाईचे मंदिर एक महिना बंद, यात्रेसह पै पाहुण्यांवरही बंदी
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली असून 13 जानेवारी ते 13 फेबुवारी पर्यंत मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पाश्वभुमीवर प्रशासकिय यंत्रणेकडून काळजी घेतली जात असताना आज सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रेदरम्यान देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्याच भाविकांनी मंदिराचे पुजन करण्याच्या या बैठकित प्रशाकिय यंत्रणेकडून सुचना देण्यात आल्या आहेत. साता-यातील मांढरदेव गडावरील काळुबाई देवीची यात्रा मोठी प्रचलित आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार गडावर सुमारे 8 लाख भाविकांनी हजेरी लावली होती.