एक्स्प्लोर
Advertisement
आता MPSC राबवणार UPSC पॅटर्न! परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मर्यादा निश्चित, कुणाला किती संधी?
एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन अधिकारी होऊ पाहणाऱ्या उमदेवारांसाठी मोठी बातमी आहे. आता एमपीएससी UPSC पटर्न राबवणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.
स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांना संधीची मर्यादा
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
- उर्वरीत मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान नऊ संधी उपलब्ध असतील.
- उमेदवारांनी पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल.
- एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल.
- उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.
- हा निर्णय 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement