एक्स्प्लोर

निरुपमांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार: सुधीर मुनगंटीवार

सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर आज जे गंभीर आरोप केले, ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले.

चंद्रपूर : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर आज जे गंभीर आरोप केले, ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले. मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. सरकारने अवनी वाघिणीला मारण्यासाठी पाच कोटी खर्च केले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला. अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या ग्लोबल मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय निरुपम यांनी केली आहे. हा ग्लोबल मार्च मुंबईतील वरळी सीफेस ते शिवाजी पार्क असा काढण्यात येणार आहे. अवनीला ज्या पद्धतीने मारलं, त्याचं समर्थन केलं जात आहे, पुरावे नष्ट केले जात आहेत, त्यामुळे मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवनीची हत्या झाल्यावर एक दिवसाने ओदिशामध्ये एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आलं. पाच कोटी रुपये खर्च करुन राज्य सरकारने कुख्यात शूटरला आणून अवनीला मारलं, असंही निरुपम म्हणाले. 2008 ते 2015 दरम्यान महाराष्ट्रात फक्त 14 वाघ मारले गेले. 2016 या एका वर्षात 16 वाघ मारले गेले, तर एकट्या 2017 मध्ये 21 वाघ मारले गेले.  मुनगंटीवार वनमंत्री झाल्यावर वाघ मारण्याची संख्या वाढली. मुनगंटीवर यांचं वर्तन पाहून त्यांना जनावरांना मारण्यात रस आहे, असं वाटतं, असा घणाघातही निरुपम यांनी केला. ते मंत्री झाल्यापासून वाघांचा जीव जातोय. त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Embed widget