एक्स्प्लोर

बुलेट ट्रेनसाठी पैसा, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष : निलम गोऱ्हे

कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं.

अहमदनगर : सरकारकडे बुलेट ट्रेनसाठी पैसा आहे, मात्र महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय, असे म्हणत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या दृष्टीकोनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकार सोळा कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र दोन वर्षांतलं हे यश नसून 2006 पासून पाठपुरावा केल्यानं शक्य झाल्याचं गोर्‍हे यांनी म्हटलं. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गोऱ्हे यांनी महिलांवरील अत्याचार आणि हत्येच्या खटल्यात आरोपींना लवकर शिक्षेसाठी वरीष्ठ न्यायालयात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज व्यक्त केली. शिक्षेनंतर आरोपी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करतात. त्यामुळे आरोपींच्या शिक्षेला विलंब होत आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात महिला अत्याचाराच्या खटल्यात जलदगती न्यायालयात सुनावणीची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संरक्षण विभागातील महिलांवर नागरिकांकडून अत्याचार झाल्यावर पीडितेला वैद्यकीय सुट्टी मिळत नाही. त्यामुळे शारीरिक दुखापत आणि वैद्यकीय मदतीचा समावेश करण्याची मागणी गोर्‍हे यांनी केली. तर पोक्सो न्यायालयात लहान मुलं आणि मुलींना अश्वासक वातावरण निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. बालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सनं साक्ष घेण्याची गरज गोर्‍हे यांनी व्यक्त केली. महिलांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं. सभागृहात महिला आमदार कमी असून मी एकटी पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इतर महिला आमदारांनी पाठपुरावा करण्याची गरज गोर्‍हे यांनी व्यक्त केली. यावेळी गोर्‍हे यांनी सरकारच्या जाहीरतीवरही नाराजी व्यक्त केली. सरकार सोळा ठिकाणी कौटुंबिक न्यायालय स्थापल्याची जाहीरात करतं. मात्र केवळ दोन वर्षात ही न्यायालयं स्थापन झाली नसून 2006 पासून वारंवार पाठपुरावा केल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी गोर्‍हे यांनी सरकारवर बोलताना पूर्वीच्या सरकारसारखं आमच्यात सख्य नसल्याची कबुली दिली. अघाडी सरकारच्या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनतेला न्याय देण्याची अपेक्षा होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलोय, मात्र आमचं हिंदुत्व सनातनी नसल्याचं ही त्यांनी म्हटलं. कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीनं समाजात नाराजी आहे. त्यामुळे सेना अंशतः समाधानी असून अस्वस्थता कायम असल्याचं म्हटलं. यावेळी गोऱ्हे यांनी पोलिसांवर ही निशाणा साधला. सध्या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा रेट 57 टक्केवर आला आहे. मात्र काही पोलीस अधिकाऱ्यांना अहंकार आणि गुर्मी आहे, असा आरोप गोऱ्हेंनी केला. नगरच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईनंतर बढती मिळण्यामागे लक्ष्मी दर्शन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget