एक्स्प्लोर
रायगडावरील 9 हजार औषधी झाडांनी माना टाकल्या !
महाड (रायगड) : रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांनी माना टाकल्या आहेत. जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती.
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर करणाऱ्या शिवेसना-भाजपच्या सरकारमध्ये किल्ले रायगडावर 8 हजार 825 हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्या आहेत. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे.
जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली.
यानंतर स्थआनिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केल्यान अखेर 9 हजार झाडांनी माना टाकल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
बीड
राजकारण
Advertisement